The Indian Air Force Surya Kiran aerobatic team will perform air show before the India vs Australia ICC World Cup final November 19 Narendra Modi Stadium  
देश

वर्ल्डकप फायनलसाठी भारतीय हवाई दलही लागलं कामाला, सूर्य किरण टीमवर खास जबाबदारी

भारतीय एअर फोर्सच्या सूर्य किरण एअरोबॅटिक टीमकडून सामन्याआधी आकाशात 'एअर शो' दाखवला जाणार आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- १९ नोव्हेंबर म्हणजे सोमवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय एअर फोर्सच्या सूर्य किरण एअरोबॅटिक टीमकडून सामन्याआधी आकाशात 'एअर शो' दाखवला जाणार आहे. सामन्याआधी नरेंद्र मोदी स्टेडियमवरती १० मिनिटांचा हा एअर शो असणार आहे. ( Indian Air Force Surya Kiran aerobatic team will perform air show before the India vs Australia ICC World Cup)

गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमींना उत्सकुता आहे. दुसरीकडे, याच सामन्यावेळी एअर फोर्सच्या सूर्य किरण टीमला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्य किरण टीमध्ये नऊ एअरक्राफ्टचा समावेश आहे. हे एअरक्राफ्ट 'हवाई करतब' दाखवतील.

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेला ३ विकेट्सनी नमवत अंतिम सामना खेळणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर करण्यास उत्सुक आहे. तर, भारताची सध्याची प्रवळ टीम पाहता, तोच सर्वात मोठा वर्ल्डकपचा दावेदार आहे. (Latest Marathi News)

सूर्य किरण टीमची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली होती. भारतीय एअर फोर्सची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून ही टीम काम करत असते. सूर्य किरण टीम त्यांच्या 'एअर शो'साठी ओळखली जाते. टीमने भारतात आणि जगातील इतर देशांमध्येही आपल्या कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. टीममध्ये एकूण १३ पायलट असतात. त्यातील ९ जण प्रत्यक्ष करतब दाखवतात. पायलट तीन वर्ष या टीममध्ये राहू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT