Travel Advisory To Iran And ISrael Esakal
देश

Travel Advisory: भारतीय नागरिकांनी 'या' दोन देशांत जाणे टाळावे, परराष्ट्र मंत्रालयाने का दिला अशा इशारा

Iran and Israel: 1 एप्रिल रोजी सीरियातील इराणच्या दूतावासावर हल्ला झाला होता. त्यावेळी इराणचे दोन सर्वोच्च लष्करी जनरल आणि इतर पाच अधिकारीही मारले गेले.

आशुतोष मसगौंडे

परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्रायलसाठी प्रवासी सूचना जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सध्या इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना विनंती केली आहे. या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी तात्काळ दूतावासाशी संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्यावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाने विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत सावधगिरी बाळगावी आणि त्यांच्या हालचालीबाबतची माहिती अनावश्यक लोकांसोबत शेअर करू नये.

पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो, अशा बातम्या समोर येत आहेत, त्यानंतर सरकारकडून हा इशारा देण्यात आला आहे.

7 ऑक्टोबर, 2023 रोजी, हमासने इस्रायलच्या काही भागांत हल्ला केला. या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला. यावेळी हमासच्या सैनिकांनी गाझामध्ये 240 लोकांना ओलीस ठेवले होते. इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांमध्ये हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. गाझाच्या 2.4 दशलक्ष लोकांपैकी 1.9 दशलक्ष लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले आहेत, त्यापैकी निम्मी मुले आहेत.

7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासचा नायनाट करण्याचा संकल्प केला होता. यासाठी इस्रायली लष्कराने गाझामध्ये हवाई आणि जमिनीवर हल्ले केले. अशाप्रकारे हमास आणि इस्रायल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून रक्तरंजित युद्ध सुरू आहे.

1 एप्रिल रोजी सीरियातील इराणच्या दूतावासावर हल्ला झाला होता. त्यामुळे दूतावासाचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल. त्याच वेळी इराणचे दोन सर्वोच्च लष्करी जनरल आणि इतर पाच अधिकारीही मारले गेले.

या हल्ल्यासाठी इराण इस्रायलला जबाबदार धरत आहे. तसेच त्यांनी सूडबुद्धीने कारवाईचा इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला की इस्रायलला शिक्षा झालीच पाहिजे.

दरम्यान इराणने हल्ला केल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, असे इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायल सतर्क झाला आहे.

अमेरिकेने इस्त्रायलला इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून हल्ला होण्याचा इशारा दिला आहे. हल्ल्याची शक्यता पाहता मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. अलीकडेच इस्रायलने आपले हवाई संरक्षण मजबूत करण्याचा आणि लढाऊ तुकड्यांना सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इराणला प्रत्युत्तर देण्याचा शब्द दिल्याने इस्रायलचे मनोबल वाढले आहे. ते म्हणाले होते की, मी पंतप्रधान नेतन्याहू यांना सांगितल्याप्रमाणे, इराण आणि त्यांच्या मित्र देशांकडून असलेल्या या धोक्यांपासून इस्रायलच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यातील १० तालुक्यांच्या पूरस्थितीचा आढावा, काय सुरू काय बंद; जाणून घ्या एका क्लिकवर

BIG UPDATE ON TEAM INDIA: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर बंदूक अन् रोहित शर्माची विकेट! BCCI च्या चक्रव्यूहात अडकणार हिटमॅन

JM Road History : ५० वर्षांत एकही खड्डा नाही... जंगली महाराज रस्त्याचा मास्टर इंजिनीअर कोण? काय आहे इतिहास?

Stock Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी 25,100 च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune News : एकतानगरीत परिस्थिती नियंत्रणात, महापालिकेकडून २४ तास यंत्रणा सज्ज; जवानही तैनात

SCROLL FOR NEXT