Sakal
देश

संतापजनक! रेल्वेतून पडल्यावर वाचला; मात्र, जिल्हा रुग्णालयात जखमीला रिकामा ऑक्सिजन सिलिंडर लावल्याने मृत्यू

Government Hospital Empty Oxygen Cylinder:देशातील शासकीय रुग्णालयाचं भयानक वास्तव!रेल्वू दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशाचा, शासकीय रुग्णालयात रिकामा ऑक्सिजन सिलिंडर लावल्याने मृत्यू

Manoj Bhalerao

Government Hospital:मध्यप्रदेशमध्ये वैद्यकिय परिस्थिती उघड करणारी परिस्थिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. बेरछा रेल्वे स्थानकावर एका राधेश्याम गुप्ता नावाच्या व्यक्तीचा अपघात झाला होता. चालत्या रेल्वेमध्ये चढताना तो पाय घसरुन पडला. या अपघातात त्याला फार गंभीर इजा झाली नाही. मात्र, डोक्याला मार लागल्याने त्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत होता. बेरछा स्थानकावर प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नजिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागला.

जेव्हा या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,तेव्हा त्याला अतिदक्षता विभागात नेण्याची गरज होती. ते प्रशासनाला करायला जमलं नाही. त्याला सर्जिकल वॉर्डमध्ये हलवल्यानंतर त्याला ऑक्सिजन देण्यासाठी जो सिलिंडर लावण्यात आला,तो रिकामा होता. या रुग्णालयाची परिस्थिती इतकी गंभीर होती की ऐनवेळी ऑक्सिमीटर आणि इंजेक्शनही मिळालं नाही. रुग्णाने जवळपास १ तास यातना सहन केल्यावर त्याने जीव सोडला.

मात्र, मुलभूत सुविधांच्या अभावामुळे शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने, आपल्या शासकीय वैद्यकीय सुविधांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या रुग्णाला जर वेळेवर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन मिळाला असता, तर कदाचित त्याचे प्राण वाचू शकले असते. मात्र, मोक्याच्या वेळी मुख्य डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित नव्हते.

४० वर्षीय या मृत व्यक्तीचे नाव राधेश्याम गुप्ता असून तो छतरपूरमध्ये वास्तव्यास होता. राधेश्याम महादेवाचं दर्शन घेण्यासाठी उज्जेनला गेला होता. परतीच्या प्रवासात रेल्वे बेरछा स्थानकावर थांबली. तो पाणी भरण्यासाठी स्टेशनवर उतरला. मात्र, पाणी भरत असताना ट्रेन चालायला लागली. घाईत त्याने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला,पण त्याचा पाय सटकला आणि तो फलटावर पडला. तो जखमी झाल्यावर त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्याचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT