pune sakal
देश

संसर्गाचा 'आर फॅक्टर' एक टक्क्यावर

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हे दिसू लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केरळसह ८ राज्यांत विषाणूचा प्रजनन दर म्हणजेच ‘फॅक्टर- आर’ हा घटक १ टक्क्याच्या वर गेल्याचे म्हटले आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हे दिसू लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health ministry) केरळसह ८ राज्यांत विषाणूचा प्रजनन दर म्हणजेच ‘फॅक्टर- आर’ ('R factor') हा घटक १ टक्क्याच्या वर गेल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे केरळमध्ये गृह विलगीकरणात (quaranteen) राहणाऱ्या कोरोनाग्रस्तांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याने तिथे पुन्हा संसर्ग (covid infection) वाढल्याचा निष्कर्ष आरोग्य पथकाने काढला आहे. (The 'R factor' of infection is at one percent)

या राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून याआधी कोरोनाच्या उद्रेकाचे कारण ईदच्या दिवशी केरळ सरकारने दिलेली सूट व त्यामुळे उसळलेली गर्दी असल्याचे म्हटले होते. मात्र आरोग्य मंत्रालयाने गृह विलगीकरणातील रुग्णांची बेशिस्त हे संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे. देशभरात केरळ, महाराष्ट्रासह ८ राज्यांतील कोरोना उद्रेकाला प्रजनन दरात झालेली मोठी वाढ कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

वैद्यकीय परिभाषेत यालाच फॅक्टर ‘आर’ किंवा ‘आर’ व्हॅल्यू असेही म्हणतात. संक्रमित रूग्ण समाजात मिसळल्यावर तो जितक्या लोकांना संक्रमित करतो त्याला ‘आर’ व्हॅल्यू म्हणतात. हाच घटक तीव्र झाल्याने या राज्यांत संसर्गाचा वेग पुन्हा वाढत चालल्याचा इशारा केंद्राने पुन्हा दिला आहे.

अठरा जिल्ह्यांत पुन्हा वाढ

देशातील एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास ५० टक्के ( ४९.८५) रुग्ण केरळचे आहेत. येथील सक्रिय रुग्णसंख्येने लाखांचा आकडा पार केला आहे. केरळ, महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ज्या १८ जिल्ह्यांत रुग्णवाढ पुन्हा वेगाने होताना दिसते तिथे, चाचण्या- रुग्णांचा माग काढणे, उपचार सुरू करणे व लसीकरण तसेच कंटेन्मेंट झोनमधील नियमांचे पालन प्रसंगी कडक लॉकडाउन आदी उपाय त्वरित अमलात आणण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

दुसरी लाट अद्याप कायम

मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४४ जिल्ह्यांत २ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे गेला होता, हेही आरोग्य यंत्रणेच्या काळजीचे कारण ठरत आहे. ८ राज्यांत १० हजार ते एक लाख इतके सक्रिय रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीचा स्पष्ट अर्थ हा की कोरोनाची दुसरी लाट अजून कायम आहे असेही अग्रवाल यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार

Delhi-Mumbai Expressway Accident : दिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर भयानक अपघात ; २५ वाहनं एकमेकांना धडकली, चौघांचा मृत्यू

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

SCROLL FOR NEXT