देश

DRDO च्या 10 हजार 2DG औषधाची दुसरी खेप उद्या होणार रवाना

विनायक होगाडे

नवी दिल्ली : डीआरडीओच्या (DRDO) इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या 2-DG या कोविड प्रतिबंधक औषधाला केंद्र सरकारच्या ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) या विभागानं नुकतीच मंजुरी दिली. हे कोविड प्रतिबंधक औषध तौडाद्वारे घेता येणारं औषध असून यामुळे कोविडचे रुग्ण लवकर बरे होत असल्याचं क्लिनिकल ट्रायलमध्ये सिद्ध झालं आहे. डॉ. रेड्डीज लॅबकडून उद्या या औषधाची 10,000 बॅचची दुसरी खेप उद्या जारी करण्यात येणार आहे. हे औषध सध्या बाजारामध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (The second batch of 10000 sachets of DRDO developed 2DG drug to be issued tomorrow by Dr Reddys Lab)

क्लिनिकल ट्रायल्समध्ये हे सिद्ध झालंय की, 2-DG हे औषध जे रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत तसेच जे रुग्ण सिलिंडरमधील ऑक्सिजन अवलंबून आहेत त्यांना हे औषध घेतल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी होऊ शकते. ज्या रुग्णांना 2 DG हे औषध दिलं जातंय त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याचं प्रमाणंही जास्त आहे. त्यामुळे या औषधाकडून लोकांच्या मोठ्या आशा आहेत.

DG-2 हे औषध DRDO नं विकसित केलं असून ते कोरोनावर प्रभावी असल्यानं त्याला कोरोनाच्या रुग्णांवर वापरासाठी नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी हे औषध आता बाजारातही आलं आहे. पण DRDO नं खास करुन कोरोनासाठी विकसित केलेलं हे औषध नाही, यापूर्वी हे औषध कर्करोगाच्या आजारावरही वापरण्यात आलं आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी याआधी ही माहिती दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध घटकांना कोरोनाशी लढा देण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले होते. तेव्हा डीआरडीओनं एप्रिल २०२०मध्ये 2-DG य औषधावर काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सदरम्यान आढळून आलं की, हे औषध SARS-Cov-2 (कोविड-१९) या आजारावर प्रभावीपणे काम करते. दरम्यान, या औषधाच्या फेज-२ मधील क्लिनिकल ट्रायलला मे २०२० मध्ये परवानगी दिली होती. त्यानंतर मे-ऑक्टोबर २०२० मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-२ च्या ट्रायलला सुरुवात केली होती. फेज-२ची ट्रायल ६ रुग्णालयांमध्ये घेण्यात आली यामध्ये ११० रुग्णांवर याची चाचणी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT