देश

Tirupati Balaji Temple : तिरूपती बालाजी मंदिरातील लाडू कसा बनतो? ५० कोटी रुपयांच्या मशीनमध्ये काय आहे असं खास

Tirupati Balaji Temple : चर्चेत आलेला तिरूपती बालाजी मंदिरातील लाडू का आहे खास?

सकाळ डिजिटल टीम

Tirupati Balaji Temple Prasad Laddu Unknown Facts

भारताला मंदिरांचा देश म्हटलं जातं. कारण, इथे प्रत्येक कोपऱ्यावर एक मंदिर आढळतं. भारताला प्राचिन मंदिरांचा वारसा लाभला आहे. भारतातील अनेक मंदिरांचा नैवेद्यही प्रसिद्ध आहे. पण, सध्या एका मंदिराच्या प्रसादावरून राजकारण तापलं आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नायडूंनी केलेल्या धक्कादायक दाव्यानुसार, तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात तयार होणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रसाद भक्तांना दिला जातो आणि त्याला अत्यंत पवित्र मानले जाते. नायडू यांनी हा आरोप एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केला.

त्यावर जगनमोहन रेड्डी यांनी नायडूंवर निशाणा साधत म्हटले की, "तिरुमला लाडूच्या पवित्रतेवर असा आरोप करणारा व्यक्ती मंदिराच्या पवित्र भावनांचा अनादर करत आहे. आम्ही, आमचे कुटुंब, देवासमोर शपथ घेऊन सिद्ध करू शकतो की, आमच्या काळात कोणत्याही प्रकारची भ्रष्टाचार झाला नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.

भारतातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचे नाव येते. तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे लाडू येथे हे प्राचिन आहेत. हे लाडू इथे ३०० वर्षांपासून बनवले जात असल्याचे सांगितले जाते. बालाजी मंदिरातील लाडू चर्चेत आला आहे. त्याबद्दलच अधिक माहिती जाणून घेऊयात.

प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या या लाडूचा इतिहास ३०० वर्षांहून अधिक जुना आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे ते बरेच दिवस खराब होत नाही आणि तुम्ही काही ठेऊन आरामात खाऊ शकता. तसेच त्याची किंमत देखील १० ते २५ रुपयांपर्यंत आहे. म्हणूनच इथे येणारे जवळजवळ प्रत्येकजण हा प्रसाद घेऊन येतो.

प्रसादाच्या स्वयंपाकघराला पोटू म्हणतात

दररोज लाखो लाडू ज्या प्रसादालयात मिळतो, 'पोटू' म्हणतात. येथे दररोज सुमारे तीन लाख लाडू तयार केले जातात. त्यामुळे लाडू बनवण्यासाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे. शिवाय, ते तयार करणारे स्वयंपाकी देखील वेगळे आहेत. या गुप्त स्वयंपाकघराला 'पोटू' म्हणतात. इथे फक्त मंदिराचे पुजारी आणि काही खास लोक जातात. येथे सर्वांना जाण्यास बंदी आहे. येथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.

लाडूंसाठी कडेकोट सुरक्षा

तिरूपती बालाजीमध्ये मिळणाऱ्या या खास लाडूची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे प्रसाद म्हणून लाडू मिळवण्यासाठी तुम्हाला सुरक्षा लाईन्समधून जावे लागेल. ज्यामध्ये सिक्युरिटी कोड आणि बायोमेट्रिक तपशील जसे की फेशियल रेकग्निशन इत्यादी असतात. लाईनमध्ये तुम्हाला पास दिला जातो. ज्या व्यक्तीचा पास आहे तिलाच लाडू मिळतो.

हे लाडू कसे तयार होतात

लाडू बनवण्यासाठी बेसन, बेदाणे, तूप, काजू आणि वेलची वापरतात. लाडू बनवण्यासाठी प्रथम तूप योग्य तापमानाला गरम करून त्यात बेसन घालून भाजले जाते. काजू, वेलची, बेदाणे आणि खडी साखर मिसळलेले लाडूचे मिश्रण मुरवले जाते. त्यानंतर हाताने वळून स्वादिष्ट लाडू तयार करतात.

लाडू बनवण्यासाठी आहे ५० कोटींची मशिन

२०२३ मध्ये तिरुमाला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी स्वयंचलित करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक नवीन मशिन बसवण्यात आली आहे. रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या सहकार्याने बसवण्यात आलेल्या या दोन मशिन्सद्वारे सहा लाख लाडू बनवले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT