The wife killed her husband The wife killed her husband
देश

पतीचे उत्पन्न कमी असल्याने पत्नीने केला खून; झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर...

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यात भांडणानंतर पत्नीने पतीचा गळा दाबून खून (wife killed her husband) केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. अनिल कुमार (वय ३२) असे मृताचे नाव आहे. (The wife killed her husband)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून भांडणे होत होती. पतीचे उत्पन्न कमी असल्याने पत्नीसोबत भांडण होत होते. भांडणानंतर पत्नीने आधी पतीला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे पती बेशुद्ध झाला. नंतर बेल्टने गळा दाबून पतीचा खून (wife killed her husband) केला. पती-पत्नीला दारूचे व्यसन होते. अनिलच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी मृताच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी पोलिसांना (Rajasthan) सांगितले की, काल रात्री उशिरा सुनेचा रडण्याचा आवाज ऐकला. यामुळे ती मुलाच्या खोलीत गेली. तेव्हा मुलगा जमिनीवर पडलेला आणि त्याची पत्नी शेजारी मोठ्याने रडताना दिसली. या घटनेनंतर शेजारच्या लोकांनी घटनास्थळ गाठून अनिलला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृताच्या शरीरावर जखमेच्या खुणा (Wound marks) असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT