Tek Fog App-BJP's IT cell app exposed
Tek Fog App-BJP's IT cell app exposed sakal
देश

Tek Fog: भाजपच्या IT सेल Appचा पर्दाफाश, द्वेष पसरवण्यासाठी वापर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भाजप पक्षाची प्रचारयंत्रणा आणि सोशल मिडीयावरी आयटी सेलचा वावर किती मजबूत आहे, याबाबत सातत्याने चर्चा सुरु असते. विरोधकांना नामोहरण करण्यासाठी आपल्या आयटी सेलचा वापर कशाप्रकारे केला, यावरुन विरोधक भाजपवर सातत्याने टीका करताना दिसतात. यासंदर्भातच आता आणखी एक मोठा खुलासा झाला असून 'द वायर' या स्वतंत्र वेब पोर्टलने याचा शोध घेतला आहे.

काय आहे हा मोठा खुलासा?

‘टेक फॉग’ (Tek Fog) नावाचे एक अत्याधुनिक व छुपे अ‍ॅप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी, टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील जनतेच्या धारणांमध्ये बदल घडवून आणण्याचे या अ‍ॅपचं उद्दिष्ट असल्याचा दावा या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: आयटी सेलची कर्मचारी राहिलेल्या एका व्यक्तीने दिली आहे.

काय आहे हे ‘टेक फॉग’ अ‍ॅप?

त्या व्यक्तीने ट्विटरवर काही ट्विट्स करत आयटी सेलवर नाराजी व्यक्त केली होती. भाजपने २०१९ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता कायम राखल्यास गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देण्याचा वायदा आपले कथित सूत्रधार देवांग दवे यांनी केला होता. देवांग दवे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय सोशल मीडिया सचिव होते. ते सध्या भाजपचे महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापक आहेत. दवे यांनी मोठ्या पगाराची नोकरी देण्याचा वायदा पूर्ण न केल्यामुळे आपण ही माहिती उघड करत आहोत, असेही त्या व्यक्तीने सांगितले होते. या ट्विट्समध्ये ‘छुप्या अ‍ॅप’चा उल्लेख केला होता. हे अ‍ॅप ‘रिकॅप्चा कोड्स बायपास’ करून वापरकर्त्यांना ‘टेक्स्ट्स व हॅशटॅग ट्रेण्ड्स ऑटो-अपलोड’ करण्याची क्षमता देते, असाही दावा केला होता. त्याच्या या दाव्यानंतर या अ‍ॅपचा शोध घेण्यात आला.

काय आहे दावा?

  • ट्विटरवरील ‘ट्रेण्डिंग’ विभाग टार्गेटेड हॅशटॅग्जसह अनधिकृतरित्या ताब्यात घेणे

  • भाजपशी निगडित अनेकविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स तयार करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे

  • भाजपवर टीका करणाऱ्या पत्रकारांच्या ऑनलाइन त्रासाचे दिग्दर्शन करणे

  • ही त्याची दररोजची कामे होती. ही सर्व कामे टेक फॉग या अ‍ॅपमार्फत केली जात होती.

कसं व्हायचं अ‍ॅपचं कामकाज?

हे अ‍ॅप अत्यंत सुरक्षित स्वरुपाचं आहे. अ‍ॅपच्या डॅशबोर्डवर लॉगइन करण्यासाठी तीन वन-टाइम पासवर्ड्सची (ओटीपी) आवश्यकता असणे तसेच आस्थापना बाहेरच्यांना प्रवेश (अक्सेस) नाकारणारी लोकल फायरवॉल त्याला आहे. मात्र, 'वायर'ने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी या अ‍ॅपचा सूत्रांच्या माध्यमातून शोध घेतला. या अ‍ॅपमधून सायबर फौजा, जनमताचा विपर्यास करणे, वेगळे मत व्यक्त करणाऱ्यांना त्रास देणे आणि भारतात पक्षपाती माहितीचे वातावरण कायमस्वरूपी निर्माण करणे, आदी उद्दिष्टांनी अ‍ॅपचा वापर करत असल्याचे यातून पुढे आले.

काय आहेत अ‍ॅपची प्रमुख कामे?

  • जनमताला हवा तसा आकार देणे

या अ‍ॅपच्या प्रमुख कार्यांपैकी एक म्हणजे ट्विटरवरील ‘ट्रेण्डिंग सेक्शन’ आणि फेसबुकवरील ‘ट्रेण्ड’ अनधिकृतरित्या ताब्यात घेणे होय.

  • ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सची चोरी

या अ‍ॅपद्वारे दिले जाणारे आणखी एक घातक फीचर म्हणजे अ‍ॅप हाताळणाऱ्या व्यक्तीला, नागरिकांची खासगी ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअ‍ॅप खाती ताब्यात घेण्याची व त्यावरून त्यांच्या ‘फिक्वेंटली कॉण्टॅक्टेड’ किंवा ‘ऑल कॉण्टॅक्ट्स’ क्रमांकांना संदेश पाठवण्याची मुभा मिळते, असाही दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

  • नागरिकांचा खासगी डेटाबेस छळासाठी वापरणे

अ‍ॅपच्या स्क्रीनशॉट्स आणि स्क्रीनकास्ट्समध्ये नागरिकांचा एक विस्तृत व बहुआयामी क्लाउड डेटाबेस दिसून येतो. या नागरिकांचे वर्गीकरण त्यांचे व्यवसाय, भाषा, वय, लिंग, राजकीय विचारसरणी आणि अगदी शारीरिक वैशिष्ट्यांनुसार करण्यात आले आहे.

  • मागमूस न ठेवण्याची ‘सुविधा’

या अ‍ॅपच्या स्क्रीन्सवरील सर्वांत महत्त्वाची सुविधा म्हणजे अ‍ॅप ऑपरेटिव्ह्ज एका क्षणात अस्तित्वात असलेली सर्व खाती डिलीट किंवा रिमॅप करू शकतात. या फीचरमुळे त्यांना त्यांच्या कामांचा सर्व पुरावा नष्ट करून टाकण्याची मुभा मिळते.

  • द्वेषपूर्ण भाषणे पेरण्यासाठी शेअरचॅटचा वापर

मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे फ्लॅगशिप उत्पादन असलेल्या शेअरचॅटचा वापर, अ‍ॅप ऑपरेटिव्ह्जद्वारे, बनावट बातम्या, राजकीय प्रचार व द्वेषपूर्ण भाषणे तयार करणे व ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यापूर्वी त्यांची चाचणी घेणे यांसाठी केला जात होता, असा दावा स्रोताने केला आहे. द्वेषपूर्ण भाषणे पेरण्यासाठी शेअरचॅटचा वापर केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT