Smriti Irani 
देश

...तर सत्येंद्रनाथ जैन यांनाही गद्दार घोषीत करावं का? इराणींचा केजरीवालांना सवाल

सत्येंद्रनाथ जैन यांची ईडीच्या कोठडीत रवानगी झाल्यानंतरही त्यांचं मंत्रीमडळातील स्थान कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील मंत्री सत्येंद्रनाथ जैन यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पलटवार केला आहे. मग त्यांना गद्दार घोषित करायला हवं का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. (then Satyendar Jain Should he be declared as desh ka gaddar says Smriti Irani)

ईराणी म्हणाल्या, केजरीवाल यांनी काल म्हटलं होतं की, भ्रष्टाचार करणारे देशाचे गद्दर आहेत. पण त्यांना माहिती आहे का? ज्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला आहे, त्यांना ते आश्रय देत आहेत. त्यांनाही देशाचा गद्दर घोषित करायला हवं का? किती काळ सरकार त्यांच्या पाठीशी राहणार?

पत्रकार परिषदेत ईराणी यांनी केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. हे खरं नाही का? प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्तांनी सांगितलंय की सत्येंद्रनाथ जैन हे स्वतः १६.३९ कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचे मालक आहेत. त्याचबरोबर दिल्लीच्या हायकोर्टानं सन २०१९ मध्ये आदेश काढला होता, यामध्ये सत्येंद्रनाथ जैन यांनी आर्थिक गैरव्यवहार केला होता. सत्येंद्र जैन यांनी २०१० ते २०१६ मध्ये हवाला मार्फत १६.३९ कोटी रुपये चार बनावट कंपन्यांना दिले आहेत. अशा व्यक्तीला केजरीवालांनी आपल्या सरकारमध्ये मंत्रीपदावर आजही कायम ठेवणार का? असा सवालही स्मृती ईराणी यांनी विचारला आहे.

दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्रनाथ जैन हे आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत. पण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पाठराखण केली असून त्यांनी कुठलाही घोटाळा केला नसल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांना अद्याप मंत्रीमंडळात कायम ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

SCROLL FOR NEXT