Rajasthan Election Esakal
देश

Rajasthan Election: भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही; उलट काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात वापरली ही स्ट्रॅटजी

या निवडणुकीसाठी भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला नाही

सकाळ वृत्तसेवा

राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागांपैकी १९९ जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी भाजपकडून मुस्लिम समाजातील एकाही व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही, याउलट सत्ताधारी काँग्रेसने १५ विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिले आहेत.

दरम्यान, भाजपने मुस्लिम उमेदवार दिले नसले तरी काँग्रेसने दिलेल्या मुस्लिम उमेदवारांविरोधात तीन ठिकाणी साधुसंतांना उमेदवारी देताना सामाजिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला आहे. यापैकी दोन मतदार संघात त्यांचा सामना काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांविरोधात आहे.

मागील निवडणुकीत भाजपने केवळ एक मुस्लिम उमेदवार दिला होता, पण त्याचाही पराभव झाला तर काँग्रेस कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १५ मुस्लिम उमेदवारांपैकी ८ जणांचा विजय झाला होता. यावेळीही काँग्रेसने १५ मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. जयपूर विभागाची लोकसंख्या सुमारे सव्वा पाच कोटी आहे, यापैकी ६२ लाख लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे.

विभागातील ४० विधानसभा मतदार संघावर मुस्लिम समाज प्रभाव पाडू शकतो. यापैकी १६ मतदार संघात यापूर्वी मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहेत तर उर्वरित २४ मतदार संघात ‘मुस्लिम व्होट बँक’ मजबूत आहे.

जयपूर हा मुस्लिमांचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे पण याठिकाणी गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेसने कधीही मुस्लिम चेहरा दिला नव्हता. यावेळी भाजप आणि काँग्रेसनेही उमेदवार बदलले आहेत. भाजपकडून बालमुकुंद आचार्य तर काँग्रेसकडून आर. आर. तिवारी रिंगणात उतरले आहेत. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अणुचाचणी घेतलेल्या पोखरण विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार सालेह महंमद तर भाजपकडून आचार्य प्रतापपुरी रिंगणात आहेत.

काँग्रेसचे महंमद हे यापूर्वी तीनपैकी दोन निवडणुकीत फार कमी मताधिक्याने विजयी झाले होते, पण २०१८ च्या निवडणुकीत ते तब्बल ३४ हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळी पुन्हा या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत आहे. याच विभागातील तिजारा मतदार संघात काँग्रेसच्या इम्रान खान यांच्या विरोधात भाजपने आचार्य बालकनाथ यांना उतरवले आहे. खान यांना या निवडणुकीत बसपाने उमेदवारी दिली होती, पण ती नाकारून रातोरात ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली.

बंदरांपासून विमानतळांवर मोदींचेच नियंत्रण

पंतप्रधान मोदी हे देशातील बंदरापासून ते विमानतळापर्यंत सर्व गोष्टी स्वतःच्या ताब्यात ठेवत आहेत, देशातील नागरिकांना गुलाम बनविण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केला. राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. आमच्या विमानांना उड्डाण करण्यासाठी परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT