corona testing sakal media
देश

Omicron: लस परिणामकारक नसल्याचा पुरावा नाही - आरोग्य मंत्रालय

ओमिक्रॉनबाबत आरोग्य मंत्रालयाची स्पष्टता; तीव्रता जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे लसीकरण झालेल्यांची प्रतिकारक्षमता कमी होऊ शकते, असा इशारा देतानाच, कोरोनावरील नव्या व्हेरियंटवर सध्याच्या लसी परिणामकारक ठरत नाहीत, याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले. नवा व्हेरियंट माणसाच्या प्रतिकारक्षमतेवर किती तीव्रतेने हल्ला करतो, यावर अभ्यास सुरू असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारताने अॅट रिस्क गटात टाकलेल्या दक्षिण आफ्रिका व चीनसह ११ देशांतून आजपावेतो ५८ विमानांतून आलेल्या १६ हजार प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्यातील १८ प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांत त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळले, असे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.ओमेक्रॉनबाबत सर्वसाधारणपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आरोग्य मंत्रालयाने दिलेली उत्तरे अशी:

प्रश्‍न: सध्याच्या लसी ओमिक्रॉनवर प्रभावी ठरतात का?

उत्तर: सध्याच्या लसी नव्या व्हेरियंटवर प्रभावी ठरत नाही याचे कोणतेही पुरावे अद्याप नाहीत. काही म्यूटेशन लसींची परिणामकारकता कमी करू शकतात. मात्र दोन्ही लसी घेतल्यानंतर शरीरातील प्रतिकारक्षमतेसह प्रतीपिंडांतही वृद्धी होते. त्यामुळे नव्या व्हेरियंटसह गंभीर आजारांवरही लसी प्रभावी ठरतील, अशी आशा आहे. त्यामुळे प्रत्येकाने पूर्ण लसीकरण करवून घेणे अत्यावश्यक आहे.

देशात तिसऱ्या लाटेची कितपत शक्यता आहे?

उत्तर: द.आफ्रिकेबाहेरच्या देशांत ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. लक्षणे पाहता हा व्हेरियंट फैलावण्याची शक्यता आहे. मात्र रुग्णवाढीचा वेग व व्हेरियंटची गंभीरता अद्याप स्पष्ट नाही.

भारतात दोन्ही लसीकरण झालेल्यांना ओमिक्रॉनचा धोका किती प्रमाणात आहे?

उत्तर: भारतात लसीकरणाचे वेगवान प्रमाण पाहता नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी अशा रुग्णांमध्ये त्याची घातकता-गंभीरता कमी असेल, असा अंदाज आहे. अर्थात यावरील वैज्ञानिकांच्या अभ्यासाचे निष्कर्ष येण्यास देशात आता सुरवात झाली आहे.

सध्याच्या चाचण्यांत ओमिक्रॉन आढळताे का

उत्तर - कोविड-१९ वरील भारतातील चाचणी पद्धती सर्वमान्य आहे. नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे का, हे समजण्यासाठीही आरटीरपीसीआर चाचणी हाच एकमेव उपाय सध्या देशात आहे.

"ओमिक्रॉनच्या घातकतेबाबत अद्याप फारशी नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी जगातील सुरवातीच्या निरीक्षणांवरून हे दिसते की, ओमिक्रॉनची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना सरसकट रूग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. कोरोनाचे नवनवे व्हेरियंट कायम येत राहणार असल्याने सौम्य लक्षणे आढळत राहतील."

- डॉ. रमण गंगाखेडकर,आयसीएमआरचे माजी प्रमुख व ज्येष्ठ वैज्ञानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT