Corona-Virus 
देश

भारतात अद्याप नवा संसर्ग नाही

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकार देखील सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या नव्या कोरोनाबाबतचे मानक दिशानिर्देश (एसओपी) आज जारी केले. कोरोनाचा हा नवा अवतार अद्याप देशामध्ये आढळून आला नसल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये, असे सरकारकडून करण्यात आले. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची व  कर्मचाऱ्यांची विमानतळावरच कोरोना आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अद्याप आपल्या देशामध्ये या नव्या विषाणूचा रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी केले आहे. भारताने ब्रिटनमधून येणारी सर्व विमाने ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा कालावधी आणखी वाढू शकतो. येत्या २६ जानेवारीला भारताने ब्रिटनच्याच पंतप्रधानांना (बोरीस जॉन्सन) प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा इतर लवाजमाही येणार हे उघड आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ वाढणार आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT