Cyclone In India google
देश

Cyclone In India: या 5 वादळांमुळे हजारो लोकांचा बळी गेला होता

बिपरजॉय वादळापेक्षाही भयंकर वादळ देशात आले होतं, ज्यात हजारो लोकांचा जीव गेला आणि कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झालं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळी गुजरातच्या कच्छ, जाखाऊ बंदराजवळ आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे अलीकडच्या काळातील अरबी समुद्रातील सर्वात भीषण वादळ आहे.

त्यामुळे त्याला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी एनडीआरएफची टीम गुजरातमधील सर्व संभाव्य जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली आहे.

बिपरजॉय वादळापेक्षाही भयंकर वादळ देशात आले होतं, ज्यात हजारो लोकांचा जीव गेला आणि कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झालं होतं. (These 5 Cyclones In India killed thousands of people)

1999 मध्ये ओडिशाच्या किनारपट्टीवर धोकादायक चक्रीवादळ आलं होतं

29 ऑक्टोबर 1999 रोजी ओ-5बी हे धोकादायक चक्रीवादळ देशात आलं होतं. हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर आलं. या वादळामुळे मोठा विध्वंस झाला होता. या वादळात 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लाखो लोक बेघर झाले होते. वादळामुळे 4.44 अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं.

या वादळाचा वेग ताशी 250 मैल इतका होता. यादरम्यान समुद्रात सहा ते सात मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. IMD च्या अहवालानुसार, 1999 चं चक्रीवादळ फॉल्स पॉइंट चक्रीवादळासारखंच होतं. जो 19-23 सप्टेंबर दरम्यान आला होता.

गुजरातमध्ये 1998 साली वादळ आलं होतं

4 जून 1998 रोजी आलेल्या वादळामुळे गुजरातमध्ये प्रचंड विध्वंस झाला होता. या वादळाची लँडफॉल कांडला बंदरात झाली. या भीषण वादळात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या वादळामुळे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. या चक्रीवादळात ताशी 165 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या चक्रीवादळामुळे संपूर्ण देशात 10000 हजार लोकांचा मृत्यू झाला. या वादळाचा विचार करून कच्छचे लोक आजही थरथर कापतात.

70 च्या दशकात भयानक वादळ आलं होतं

भारतातील 70 च्या दशकातील सर्वात भीषण वादळांमध्ये या वादळाची गणना केली जाते. त्यामुळे ओडिशा आणि आंध्रप्रदेशचे सर्वाधिक नुकसान झालं होतं. या वादळात वाऱ्याचा वेग ताशी 193 किमी इतका होता. या वादळात 10,000 लोकांचा मृत्यू झाला होता. हे वादळ इतकं धोकादायक होतं की याचा परिणाम छत्तीसगडपर्यंत दिसून आला होता. या वादळामुळे एकूण 350 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.

ओडिशामध्ये आलेलं दुसरं भयानक वादळ

26-30 ऑक्टोबर 1971 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर एक भयानक वादळ आलं होतं. जमिनीवर येताना या वादळाचा वेग 150 ते 170 किमी इतका होता. या वादळात 10,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या वादळात 10 लाखांहून अधिक लोक बेघर झाले. हे वादळ इतके भीषण होते की त्यात 50 हजार गुरे मरण पावली होती आणि 8 लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले होते.

2021 चं तौक्ते वादळ

2021 मध्ये मे महिन्यात तौक्ते वादळ गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीला धडकलं होतं. हे वादळ गुजरातमधील 1998 नंतरचे सर्वात भीषण समुद्री वादळ मानले जाते. या वादळात 170 जणांचा मृत्यू झाला होता. 20,0000 हून अधिक लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. या वादळात हजारो गुरे आणि वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. या वादळादरम्यान ताशी 125 मैल वेगाने वारे वाहत होते. या वादळात 40000 हजाराहून अधिक झाडे उन्मळून पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Plane Crash : तू इंधन का बंद केले? विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही पायलटमधील संवाद समोर....

Video : कुटुंब गाढ झोपलेलं अन् अचानक समोर फणा काढलेला किंग कोब्रा; बेडरूममध्ये पुढे जे झालं...,थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात एअर इंडियाची चूक झाली की नाही? तपास अहवालावर कंपनीची भूमिका आली समोर

Latest Marathi News Updates : रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी

Healthy Aging Tips: वय वाढलं तरी आरोग्य टिकवायचंय? मग 'हे' नियम पाळाच!

SCROLL FOR NEXT