Unemployment Rate Sakal
देश

Unemployment Rate: 'या' देशांमध्ये आहे सर्वाधिक बेरोजगारी, भारताचाही समावेश टॉप-5 मध्ये

भारतातील शहरी भागात बेरोजगारीचा दर मार्च महिन्यात 8.51 टक्के होता

राहुल शेळके

Unemployment Rate: अनेक देशांसाठी बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. भारतातील अनेक दशकांपासून बेरोजगारी हा गंभीर निवडणुकीचा मुद्दा बनला आहे आणि त्यामुळे अनेक आंदोलने झाली आहेत.

जर आपण सर्वोच्च बेरोजगारी दर नुसार बोललो, तर भारताचा देखील जगातील सर्वोत जास्त बेरोजगारी असणाऱ्या देशांमध्ये समावेश आहे.

भारतात प्रचंड बेरोजगारी:

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, मार्च 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर सलग दुसऱ्या महिन्यात 7.8 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सीएमआयच्या आकडेवारीनुसार, भारतातील शहरी भागात बेरोजगारीचा दर मार्च महिन्यात 8.51 टक्के होता, तर ग्रामीण भागात 7.47 टक्के होता. देशातील बेरोजगारीची स्थिती सध्या अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येते.

हे 4 देश भारताच्या पुढे:

अनेक देशांसमोर बेरोजगारी हे आव्हान आहे. काही देशांमध्ये बेरोजगारीचा दर दुहेरी अंकात आहे. द वर्ल्ड रँकिंग नावाच्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, दक्षिण आफ्रिकेत सध्या जगात सर्वाधिक बेरोजगारी आहे.

या देशातील बेरोजगारीचा दर सध्या 32.7 टक्के आहे. स्पेन आणि तुर्कियामध्येही बेरोजगारीचा दर 10-10 टक्क्यांहून अधिक आहे. 8.8 टक्के बेरोजगारी दरासह ब्राझील चौथ्या क्रमांकावर आहे, तर इटली 7.8 टक्क्यांसह भारतासह पाचव्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक बेरोजगारी असलेले देश:

जगातील सुमारे डझनभर देशांमध्ये 5 टक्क्यांहून अधिक बेरोजगारी आहे. भारतानंतर फ्रान्स 7.2 टक्के बेरोजगारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, अर्जेंटिना, जर्मनी, इंडोनेशिया, चीन आणि कॅनडामध्ये बेरोजगारीचा दर 5-5 टक्क्यांहून अधिक आहे.

भारतात जवळपास वर्षभरात बेरोजगारीचा दर 7 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. डिसेंबर 2022 मध्ये तो 8.30 टक्क्यांच्या उच्च पातळीवर पोहोचला होता.

त्यानंतर जानेवारीमध्ये त्यात मोठी घसरण होऊन ती 7.14 टक्क्यांवर आली. मात्र, त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत असून मार्चमध्ये ती पुन्हा 8 टक्क्यांच्या जवळ पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT