Thief in Tamil Nadu Leaves Apology Note Esakal
देश

Thief in Tamil Nadu Leaves Apology Note: चोराने घरात चोरी केली अन्... घरमालकाला लिहली चिठ्ठी; म्हणाला, 'एका महिन्यात परत...'

Thief in Tamil Nadu Leaves Apology Note: चोरट्याने ६० हजारांची रोकड, सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण असा ऐवज पळवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

तामिळनाडूमध्ये चोरीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तुतीकोरीन जिल्ह्यातील एका घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी रोख रक्कम व दागिने गायब असल्याचे आढळून आले. मात्र, रिपोर्टनुसार या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोराची चिठ्ठी.

ही चोरीची घटना ७९ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक चिथिराई सेल्विन यांच्या घरी घडली आहे. सेवानिवृत्त शिक्षक सेल्विन यांच्या कुटूंबात पत्नी आणि चार मुले आहेत. चेन्नईतील आपल्या मुलाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हे जोडपे १७ जून रोजी घराबाहेर पडले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री मोलकरीण घरी पोहोचली तेव्हा घराचे गेट उघडे पाहून तिला धक्काच बसला. घरात कोणीतरी शिरल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने ताबडतोब मालक व पोलिसांना बोलावले.

चोराने चोरी केल्यानंतर ठेवली एक चिठ्ठी

चोरट्याने ६० हजारांची रोकड, दोन जोड सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण असा ऐवज पळवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. मला माफ करा अशी चिठ्ठीही चोरट्याने ठेवली आहे. मी ते एका महिन्यात परत करीन. माझ्या घरात कोणीतरी आजारी आहे. म्हणूनच मी हे करत आहे. मेघनापुरम पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

यापूर्वी चीनमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते

याआधीही चीनमधील शांघायमध्ये एका व्यक्तीने दुकानातून चोरी करून मेसेज लिहला होता. त्याने मालकाला त्याची अँटी थेफ्ट सिस्टम अपग्रेड करण्यास सांगितले. चोरट्याने बिल्डिंगच्या बाहेरील भिंतीवर चढून आत प्रवेश केला आणि ॲपल मॅकबुक आणि घड्याळ चोरून नेले. आत गेल्यावर, सेल फोन, लॅपटॉप गोळा केले आणि त्यांचा ढीग केला. त्यांच्यासोबत एक चिठ्ठी लिहून ठेवली.

चोराने त्याच्या चिठ्ठीत लिहिले की प्रिय बॉस, मी एक घड्याळ आणि लॅपटॉप घेतला. तुम्हाला तुमची थेफ्ट सिस्टम अपग्रेड करणे आवश्यक आहे. मी सर्व फोन आणि लॅपटॉप घेतले नाहीत. याचे कारण सांगताना त्यांनी लिहिले की, मला भीती वाटत होती की यामुळे तुमच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला तुमचा लॅपटॉप आणि फोन परत हवा असेल तर माझ्याशी संपर्क करा, असेही चोराने लिहिले आहे. चोरट्याने सोडलेल्या नंबरच्या मदतीने आणि कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना कळले. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT