thief returned costly mobile after unable to use that at west bengal 
देश

मोबाईल चोरलाय पण वापरता येत नाही; येता का...

वृत्तसंस्था

कोलकताः एका चोराने महागडा मोबाईल चोरला. पण, त्याला तो वापरता येत नसल्यामुळे मालकाला घरी बोलावले आणि मोबाईल परत केला. चोर आणि मालकाचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, 'प्रामाणिक' चोरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

महागडा मोबाईल चारीची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली असून, याबाबतची चर्चा परिसरात रंगली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पूर्व वर्धमान जिल्ह्यातील जमालपूर येथील मिठाईच्या दुकानातून एका चोरट्याने महागडा मोबाईल चोरला होता. पण, तो मोबाईल वापरायचा कसा, याबाबत त्याला समजत नव्हते. दुसरीकडे मोबाईलच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तपास सुरू करायच्या अगोदरच मालकाने मोबाईलवर फोन केला. चोर म्हणाला, 'तुमचा मोबाईल चोरला आहे. पण, मला कसा वापरायचा ते समजत नाही. तुम्ही माझ्या घरी या आणि मोबाईल घेऊन जा बोलला.'

दरम्यान, मोबाईल मालक सोबत पोलिसांना घेऊन चोराच्या घरी गेला. चोराने मोबाईल काढून मालकाला दिला. पोलिस कारवाई करणार तोच मालकाने कारवाई न करण्याची विनंती केली. पोलिसांनीही कारवाई केली नाही. दोघांची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इस्रायल इराण युद्धाचा थेट परिणाम, कच्च्या तेलाच्या दराचा भडका; पेट्रोल-डिझेल महाग होणार?

Iran vs Israel युद्ध आणखी भडकणार! इराणला पाठिंबा देत हिजबुल्लाहचे इस्रायलवर हल्ले, इस्रायलचा लेबनॉनच्या राजधानीतही विध्वंस

Minor Sexual Assault Case : सांगली हादरली! अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांकडून सलग 2 वर्षे लैंगिक अत्याचार; जन्मदात्या आईने परराज्यात जाऊन मुलीचा केला गर्भपात

Latest Marathi News Live Update : मिरज शहरात दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

मोठी बातमी! ५ किलोमीटरमधील कमी पटाच्या शाळांचे दुसऱ्या शाळेत होणार समायोजन; शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यातील २५० शाळांचे भवितव्य अंधारात

SCROLL FOR NEXT