sputnik v covid-19 vaccine 
देश

Corona Vaccine: दहा दिवसांत भारतात येणार तिसरी लस; केंद्र सरकारची दिलासादायक माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सध्या सुरु आहे. दरम्यान, लसीच्या नव्या टप्प्यांमध्ये लस घेणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लसींचा तुटवडा भासत असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इतर लस निर्मितींचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. दरम्यान, उच्चपदस्थ सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत भारतात आणखी पाच कंपन्यांची लस दाखल होणार आहे. त्यातच रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लसीला भारतात आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. 

मुंबईत आणखी 4 कोविड सेंटर उभारणार; महापौरांची घोषणा

सुत्रांच्या माहितीनुसार, भारतात सध्या 'कोविशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' या दोन कोविड-१९ लस उपलब्ध आहेत. या दोन्ही लसींचे उत्पादन भारतातच होत आहे. यानंतर येत्या तिमाहित आणखी पाच लस भारतात दाखल होणार आहेत. यामध्ये 'स्पुटनिक व्ही' ही लस (डॉ. रेड्डीज या फार्मा कंपनीच्या सहकार्याने), 'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन' (बायोलॉजिकल ई या फार्मा कंपनीच्या सहकार्याने), नोवाव्हॅक्स (ही लस सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने) तसेच झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक स्वतः एक लस बाजारात आणणार आहे. यामध्ये या लसींना आपत्कालिन वापरासाठी परवानगी देताना सुरक्षा आणि प्रभावीपणा हा केंद्र सरकारचा प्राथमिक काळजीचा विषय आहे.

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार
 
जगभरात जवळपास २० कोरोना प्रतिबंधक लसींवर विविध क्लिनिकल आणि प्रि-क्लिनिकल पातळ्यांवर चाचण्या सुरु आहेत. यांपैकी रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लसीला पहिल्यांदा परवानगी मिळणार आहे. पुढील दहा दिवसांत 'स्पुटनिक व्ही'ला देशात आपत्कालिन वापरसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.  

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचा 'या' भारतीय कंपन्यांसोबत करार

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) भारतीय फार्मा कंपन्यांसोबत सहकार्य करार केला आहे. यामध्ये हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, हेटरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिअस बायोफार्मा आणि विक्रो बायोफार्मा यांच्यामार्फत लसीचे डोस तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या सर्वांची मिळून 'स्पुटनिक व्ही' चे देशात ८५० मिलियन (८ अब्ज ५० कोटी) डोस तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतात 'स्पुटनिक व्ही' ही कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावेल अस सांगण्यात येत आहे. 

पाच लस कधीपर्यंत येणार?

या सर्व लसी कधीपर्यंत भारतात उपलब्ध होतील? या प्रश्नावर उत्तर देताना टॉप अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "स्पुटनिक सर्वात आधी जूनपर्यंत बाजारात येईल. जॉन्सन अँड जॉन्सन ऑगस्टपर्यंत येईल, कॅडिला झायडस ऑगस्टमध्ये येईल, नोवाव्हॅक्स सप्टेंबरमध्ये तर नाझल व्हॅक्सिन ऑक्टोबरपर्यंत बाजारात येईल" 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT