Yogi Adityanath esakal
देश

"हा तर रामभक्तांचा अपमान"; काँग्रेसच्या आंदोलनावर भडकले योगी आदित्यनाथ

काँग्रेसनं देशभरात आज महागाईसह विविध मुद्द्यांवर आंदोलन केलं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसनं देशभरात आज विविध ठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र चांगलेच भडकले. हा रामभक्तांचा अपमान असल्याचं म्हणत काँग्रेसनं भारताच्या श्रद्धेचा अपमान केल्याचा आरोप केला. (This is an insult to Ram devotees CM Yogi Adityanath got angry over Congress agitation)

CM योगी म्हणाले, आत्तापर्यंत काँग्रेसकडून साध्या कपड्यांमध्ये आंदोलन सुरु होतं. पण आजच्याच दिवशी त्यांनी काळे कपडे घालून आंदोलन केलं. आजचा अयोध्या दिवसच त्यांनी यासाठी निवडला. आजच्याच दिवशी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. त्यामुळं आज अशा प्रकारे काळे कपडे घालून निषेध आंदोलन करुन काँग्रेसनं रामभक्तांचा अपमान केला आहे.

अशा प्रकारे आंदोलन करत काँग्रेसनं भारताच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्याचबरोबर अयोध्या दिवसासह भारताची लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचाही काँग्रेसनं अपमान केला आहे, अशा पक्षाच्या या आंदोलनाचा आम्ही निषेध करतो, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT