Arrest
Arrest Sakal
देश

चीनकडून हेरगिरी अन् डेटा चोरी; तीन चिनी नागरिकांना नोएडातून अटक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील नोएडा येथून तीन चीनी नागरिकांना स्पेशल टास्क फोर्स (STF)कडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट भारतीय आधार कार्डही जप्त केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार तिन्ही आरोपी नेपाळ सिमेवर अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिक आणि त्यांचा मित्र नटवरलाल यांच्या जवळचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चेन जुनफेंग, लिऊ पेंगफेई आणि झांग किआओ असं अटक करण्यात आलेल्या चीनी नागरिकांची नावे असून ते हेरगिरी करत भारतीय नागरिकांचा डेटा चीनला पाठवत असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत १७ लोकांना पकडण्यात आलं आहे. ११ जून रोजी पकडण्यात आलेल्या लू लांग आणि युन हेलांग या दोघांच्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला होता. हे दोघेही अवैध पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे भारतात प्रवेश करत होते. त्यानंतर १३ जूनला पोलिसांनी सुफाई आणि त्याची प्रेयसी पेटेख रेनुआला अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये ते भारतीयांची माहिती चीनमध्ये पाठवत असल्याची माहिती समोर आली होती. पण ते ही माहिती कोणत्या कारणासाठी चीनमध्ये पाठवत आहेत याची माहिती समोर आली नाही.

अटक करण्यात आलेल्या या तीन नागरिकांचे नटवरलाल आणि त्याच्या टोळीशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. ते चलन हस्तांतरित करून चीनला पाठवत होते. यावेळी त्यांनी भारतीय बनावटीचे आधार कार्डही सोबत ठेवले होते. त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्या एकाच्या मैत्रिणीकडे बिटकॉईन मिळाले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास चालू आहे.

काय आहे नटवरलालचे प्रकरण?

जूनमध्ये एसएसबीच्या पथकाने लू लांग आणि युन हेलांग या दोन चिनी नागरिकांना पासपोर्ट-व्हिसाशिवाय नेपाळ सीमेवर पकडले होते. हे दोघेही चिनी हेर असल्याचा संशय होता. 24 जून रोजी चोरी करून त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचं चौकशीत समोर आलं होतं. त्यानंतर टॅक्सीने ते नोएडाला आले. यानंतर पोलिसांनी चिनी नागरिक सुफई आणि तिचा मित्र रवी उर्फ ​​नटवरलाल, एबिना आणि इतरांना अटक केली. प्रत्येकजण भारतात हेरगिरी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय गैरव्यवहार करत कोट्यवधी रुपये चीनमध्ये पाठवले जात असल्याचं समोर आलं होतं. या टोळीशी संबंधित आणखी तीन चिनी नागरिकांना एसटीएफने काल अटक केली आहे. चेन जुनफेंग, लिऊ पेंगफेई आणि झांग किआओ अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही नोएडामधील सेक्टर-93 च्या बी ब्लॉकमध्ये राहत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT