श्रीनगर दहशतवादी हल्ला
श्रीनगर दहशतवादी हल्ला esakal
देश

श्रीनगर दहशतवादी हल्ल्यातील आणखी एका जखमी जवानाचा आज मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या तीन झाली आहे.

श्रीनगरमध्ये (Srinagar) सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (Terrorist Attack) मृतांची संख्या तीन झाली आहे. सोमवारीच रुग्णालयात दोन पोलिसांचा (Police) मृत्यू झाला होता, तर एकाची प्रकृती चिंताजनक होती. सध्या 11 जखमी जवानांवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काश्‍मीर (Kashmir) झोनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी श्रीनगरच्या बाहेरील जेवनमधील पंथा चौकात दहशतवाद्यांनी पोलिस बसवर गोळीबार (Firing) केला. दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता आणि गोळ्या झाडून बसचे टायर पंक्‍चर केले होते. (Three soldiers were martyred in the attack in Srinagar)

एवढेच नाही तर दहशतवाद्यांनी असा भीषण हल्ला घडवून आणण्यामागे पोलिसांकडे शस्त्रास्त्रांची (Weapons) कमतरता हेही एक कारण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास जम्मू-काश्‍मीर (Jammu and Kashmir) सशस्त्र पोलिसांच्या (Armed Police) नवव्या बटालियनच्या जवानांना घेऊन जाणारी बस जेवनमधील पोलिस प्रशिक्षण शिबिराजवळ (Police Training Camp) आली. दरम्यान, अगोदरच घुसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला. जवान मोर्चा हाताळत होते तोपर्यंत बसवर प्राणघातक हल्ला करून दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. काश्‍मीर झोन पोलिसांनी (Kashmir Zone Police) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहीद झालेल्या जवानांमध्ये एएसआय गुलाम हसन (रा. टॉप नील, रामबन) आणि सिलेक्‍शन ग्रेड कॉन्स्टेबल शफीक अली (रा. माहोर रियासी) यांचा समावेश आहे.

याशिवाय रुग्णालयात दाखल अन्य तीन पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम राबवली जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी, काश्‍मीर झोन पोलिसांनी ट्विट करून दहशतवादी हल्ल्यात 14 पोलिस जखमी झाल्याचे सांगितले होते. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देश श्रद्धांजली अर्पण करत असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर दहशतवादी हल्ल्यात नऊ सुरक्षा जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाचही दहशतवादी ठार झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

SCROLL FOR NEXT