Kashmir 
देश

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ डिजिटल टीम

बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ते जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे आहेत.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu And Kashmir) बडगाममधील (Budgam) जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा दलाने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. अद्याप चकमक सुरु असून आणखी काही दहशतवादी लपून बसले असल्यानं त्यांचा शोध घेतला जात आहे.

काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ते जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी रात्री चकमक सुरु झाली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात जोलवा गावात शोधमोहिम सुरु केली होती. त्यात दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यानतंर प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलाने गोळीबार केला. एकजण श्रीनगरमधील असून वसिम असं त्याचं नाव आहे.

याआधी पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. ते तिघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित होते आणि त्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT