Tiger
Tiger esakal
देश

काय? हसणाऱ्या वाघाचा फोटो; वाचा काय आहे याचं कारण...

सकाळ वृत्तसेवा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये वाघ हसताना दिसतोय

वाघ इतके भितीदायक असतात की, त्यांचे नाव ऐकल्यावरच आपल्या मनांमध्ये भिती निर्माण होते. आणि जर तो वाघ कुठे तरी समोर आला तर हात-पाय भितीने कापू लागतात. सोशल मीडियावर (Social Media) वाघाचे अनेक व्हिडिओ नेहमी व्हायरल होतात, ज्यात वाघ शिकार करताना किंवा त्याच्या धोकादायक अंदाजात दिसत असलेला पाहावयास मिळतो.

तुम्ही कधी वाघाला (Tiger) हसताना पाहिलंय का? जर तुम्हाला दिसत नसेल तर पाहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो, ज्यात वाघ हसताना दिसतोय. पण, तसे मुळीच काही नाहीयेय. खरं तर या फोटोमागे जे खरं आहे ते वाघाच्या धोकादायक, भयाण आणि मजबूत दातांशी संबंधित आहे, ज्यात एकदा का शिकार अडकली तर मग कोणत्याही परिस्थितीत तिथून पळ काढता येत नाही.

व्हायरल (Viral) होत असलेला हा फोटो मोना पटेल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये या फोटोचे संपूर्ण सत्य दडलेले आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलंय की, वाघ दातांशिवाय जन्माला येतात. काही आठवड्यांतच त्यांचे दुधाचे दात निघतात. त्यांचे दात आपल्या माणसांप्रमाणेच तुटतात. परंतु त्यांचे प्रौढ (अडल्ट) दात हे त्यांचे दुधाळ दात स्वतःच तोडतात. त्यांच्या दातांमध्ये खूप अंतर असते. म्हणूनच ते शिकार घट्ट पकडतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो लोकांना पसंत पडत असून त्यातून सर्वांना बरीच माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर हसणे हे सर्वात मोठे औषध आहे, अशी कमेंटही एका यूजरने केली. या सुंदर फोटोबद्दल आणि माहितीबद्दल युझर्सनी आभारही मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT