tina dabi 
देश

घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर टीना डाबीची इंस्टाग्राम पोस्ट; व्यक्त केल्या भावना

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- लोकसेवा आयोगाने 2015 मध्ये घेतलेल्या परीक्षेत टीना डाबी टॉपर आल्या होत्या. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी ही कमाल केली होती. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. त्यानंतर त्यांनी एप्रिल 2018 मध्ये अतहर आमिर याच्यांशी लग्न केलं. आमिर यांनी युपीएससीमध्ये त्यांच्याच बॅचला देशात दुसरा क्रमांक मिळवला होता. काही दिवसांपूर्वी हे दोघे घटस्फोट घेत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर टीना डाबी यांनी इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. यात त्यांनी गेल्या काही दिवसात वाचलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

अर्णब गोस्वामींना झटका; तपास CBI कडे देण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

ही एक लेट पोस्ट आहे. गेल्या काही दिवसात मी खूप पूस्तके वाचली. पुस्तक वाचून झाल्यावर मी माझे विचार एका कागदावर मांडत असते. आता यात मी असाही भाग सामील केलाय जो मला सर्वात चांगला वाटतो. मी आशा करते की तुम्हालाही ही पुस्तके वाचून आनंद होईल, जितका मला झाला होता, असं टीना डाबी पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत. यापैकी तुम्ही एखादे पुस्तक वाचले असेल तर आपणही समीक्षा शेअर करा, असही त्या म्हणाल्या आहेत. 

टीना यांनी यामध्ये एका पुस्तकाचा विशेष उल्लेख केला आहे. 'अ जेन्टलमन इन मॉस्को' या पुस्तकाने मला हलवून सोडले. यात एक वाक्य आहे, ''कुणीही व्यक्ती परिस्थितीवर प्रभूत्व मिळवत नाही, तर तो ते प्रभूत्व मिळविण्यास बांधील असतो'', असं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी वाचलेल्या पुस्तकाची यादी टाकली आहे. गुड वाइब्स, गुड लाईफ, अल्टिमेट ग्रँडमदर हॅक्स, देवदत्त पटनायक यांची हनुमान चालिसा, दोज डिलिशियस लेटर या पुस्तकांचा समावेश आहे.  

२५ रुपयांच्या पेट्रोलसाठी तुम्ही मोजताय ८७ रुपये; याचा कधी विचार केलाय?

दरम्यान, आयएएस टीना डाबी आणि पती अतहर आमिर यांनी जयपूरच्या फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. घटस्फोटाच्या अर्जात आम्ही यापुढे एकत्र राहू शकत नाही. न्यायालयाने आमचं लग्न शून्य घोषित करावं असं म्हटलं आहे. दोघेही 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या टीना डाबी वित्त विभागात संयुक्त सचिव तर आमिर सीईओ ईजीएस या पदावर आहे. 

टीना डाबीने लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये आडनावात खान जोडलं होतं. तसंच काश्मीरी सून असा टॅगही अॅड केला होता. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरून आपल्या नावातून खान शब्द हटवला होता. तसंच टीनाने तिच्या फॉलोअर्सना ट्विटरवरून सांगितलं होतं की, तिने पतीला ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT