देश

उपमुख्यमंत्र्यांसह 'आप'च्या १७ नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल; कोरोना नियमांचे उल्लंघन

विनायक होगाडे

आग्रा : तिरंगा यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या १७ नेत्यांसह ५०० अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांचाही यात समावेश आहे.

आपने रविवारी आग्र्यातील जीआयसी मैदान ते शहीद स्मारकदरम्यान यात्रा काढली होती. त्यात सिसोदिया, सिंह यांच्यासह आपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. पोलिसांनी कोरोनामुळे केवळ ५० जणांच्या उपस्थितीत यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. मात्र, यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्यांनी या नियमाचे उल्लंघन केले. या सर्वजणांविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांसह साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत अयोध्या, लखनौत तिरंगा यात्रा काढण्याचे आपचे नियोजन आहे. अयोध्येसह उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा मतदारसंघात यात्रा काढण्याची घोषणा सिसोदिया यांनी केली आहे.

या सगळ्या प्रकारावर मनीष सोसिदिया यांनी भाजप सरकारवर टीका केलीय. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी तिरंगा यात्रा काढल्यावर भाजप सरकार FIR दाखल करत आहे. इंग्रज निघून गेले आहेत मात्र भाजपची मानसिकता अद्याप देखील इंग्रजाची गुलाम आहे. आशीर्वाद यात्रा, बंगाल निवडणुक, वाराणसीतील सभा होऊ शकतात मात्र, तिरंगा यात्रा काढणे अपराध आहे. जेवढे हवेत तेवढे FIR दाखल करा मात्र, तिरंगा यात्रा या काढल्या जाणारच, असा निर्धार त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT