TIRF Sakal
देश

सोशल मीडियावर सरकारविरोधी पोस्ट करु नका; TIFR चे कर्मचाऱ्यांना आदेश

कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना याबद्दल सांगण्याचे आदेशही दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले असून त्यामध्ये त्यांनी सरकारविरोधी माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याचं अवाहन केलं आहे. सरकारविरोधी, संस्थांच्या सुविधाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडिया जसे की, फेसबुक, व्हाटस्अपवर शेअर न करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना याबद्दल सांगण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच हा आदेश नवा नसल्याचंही स्पष्टीकरण TIFR ने यावेळी दिले.

हा निर्णय हा सर्व सरकारी विभागांना आणि कर्मचाऱ्यांना आधीपासूनच लागू आहे पण TIFR सारख्या संस्थांमध्ये संवेदनशील उपकरणे आणि यंत्रे असतात. या संस्थेतील माहिती गोपनीय ठेवण्यासाठी हा आदेश पुन्हा नव्याने काढण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

TIFR चे रजिस्ट्रर विंग कमांडर जॉर्ज एंटनी यांनी १३ एप्रिलच्या एका पत्रात सांगितलं की, परमाणु उर्जा विभाग (DAE) कार्यालय आणि सुविधा यासंदर्भात पाठीमागे फोटो, आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. नाराज कर्मचारी यासारखे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. या गोष्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, संस्थेच्या कोणत्याही भागाचे, फील्ड स्टेशन, कॉलनी आणि कोणत्याही सरकारी संपत्तीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करु नका. त्याचबरोबर कोणत्याच वादग्रस्त विधान किंवा गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्यात येऊ नयेत असं अवाहन त्यांनी केलं. तसंच लहान मुलांनाही या गोष्टी सांगण्याचं अवाहन कर्मचाऱ्यांना केलं आहे. या आदेशावरील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर प्रोफेसर एस. रामकृष्णन हे सोमवारी देणार आहेत.

दरम्यान हे पत्र डीएई च्या सूचनांच्या आधारे पाठवलं आहे. या संस्थेच्या देशभर शाखा आहेत. संस्थेच्या संदर्भातील काही व्हिडीओ मागे व्हायरल झाले होते. त्यानंतर TIFR ला त्यांनी याप्रकरणी नोटीस काढली होती. त्यानंतर TIFR ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत आदेश दिले आहेत. त्यामध्ये त्यांना दोन सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये संस्थेच्या परिसरातील व्हिडीओ आणि फोटो शेअर करु नये. आणि फेसबुक, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर सरकार विरोधी मत शेअर करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

हे निर्बंध फक्त कर्मचाऱ्यांनाच लागू नसून टीव्ही, ईलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियासारख्या सर्व माध्यमांना लागू आहेत. पण या पत्रात या नियमांची पुन्हा आठवण करुन देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT