PM Narendra Modi Tripura visit Team eSakal
देश

मोदींच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालय बंद, तृणमूलची जोरदार टीका

सकाळ डिजिटल टीम

त्रिपुरा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) कार्यक्रमासाठी महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. मोदींच्या हस्ते महाराजा वीर विक्रम विमानतळाच्या (Maharaja Bir Bikram Airport) नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना त्रिपुरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (TIT) प्राचार्यांनी दिल्या आहेत. याबाबत त्यांनी एक नोटीस जारी केली आहे. यावरूनच तृणमूल काँग्रेसने (TMC) मोदींवर टीका केली आहे.

प्राचार्यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये ४ जानेवारीला महाविद्यालय बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, अशी सूचना केली आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. '' पंतप्रधान मोदींचा ढोंगीपणा उघड झाला असून मोदींसाठी शिक्षण आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा याला काहीच प्राधान्य नाही का? विद्यार्थ्यांना उपस्थित राहता यावे म्हणून वर्ग रद्द केले आहेत. कोरोनात लोकांचे जीव धोक्यात घालून कार्यक्रमाला गर्दी व्हावी यासाठी मोदींची ही योजना आहे का?'' असा घणाघात तृणमूलने केला आहे.

दरम्यान, त्रिपुरा कामगार संचालनालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना स्वामी विवेकानंद मैदानावर पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यावरून देखील तृणमूलने टीका केली आहे. पंतप्रधानांची कमी होत चाललेली लोकप्रियता आणि असुरक्षिततेमुळे या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत, असा दावा तृणमूलने केला आहे. तसेच ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आपण किती जीव धोक्यात घालत आहोत याची काळजी पंतप्रधानांना नाही, असा आरोपही तृणमूलने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cabinet Meeting Decision: विद्यार्थ्यांसह खेळाडूंना फायदा होणार, मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय

Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Marathi News Live Updates : पार्थ चॅटर्जी, अर्पिता मुखर्जी, कुंतल घोष आणि इतर यांच्याविरुद्ध कोलकाता येथील विशेष न्यायालयात तक्रार दाखल

Gadchiroli Hospital: गडचिरोलीत दुर्दैवी घटना! ‘इथेच सिझर करा’ कुटुंबीयांची विनंती, तरीही रेफर; बाळासह २१ वर्षीय मातेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT