देश

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या; भाजप नेत्याविरोधात गुन्हा

वृत्तसंस्था

कोलकता- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची हत्या करण्याता आली आहे. शनिवारी रात्री गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात शनिवारी रात्री ही घटना घडली. सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता, पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती सांगण्यात आली आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. चिटफंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाजपनेते मुकुल रॉय यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

तृणमूल काँग्रेसने केलेल्या या आरोपाचे खंडन करताना भाजपने सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, सत्यजीत बिश्वास हे एक चांगले नेते होते, त्यांचा असा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब असून प्रत्येकवेळी भाजपवर हल्याचा आरोप केला जातो परंतु, नंतर पुढे येते की त्यांच्या अतंर्गत कलहातून हा हल्ला झाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात अनेक समाजघातक कृत्य करणारे लोक आहेत. याबाबत सीबीयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही घोष यांनी यावेळी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT