TMC MP Mahua Moitra esakal
देश

Mahua Moitra : मी सफरचंदला सफरचंदच म्हणेन, संत्री नाही; आक्षेपार्ह वक्तव्यानंतर TMC खासदार भाजपवर भडकल्या

टीएमसी खासदारानं शिवीगाळ केल्यामुळं लोकसभेत मोठा गदारोळ पहायला मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

भाजप खासदार हेमा मालिनी यांनीही महुआ मोईत्रा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं निशाणा साधलाय.

नवी दिल्ली : लोकसभेच्या कामकाजादरम्यान टीएमसी खासदार महुआ मोइत्रा (TMC MP Mahua Moitra) यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला. टीएमसी खासदारानं शिवीगाळ केल्यामुळं लोकसभेत मोठा गदारोळ पहायला मिळाला.

त्यानंतर भाजपच्या (BJP) खासदारांनी मोइत्रांनी माफी मागावी, अशी मागणी केली. पण, तरीही त्या आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्या. महुआ मोइत्रांना पत्रकारांनी त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत प्रश्न विचारला.

त्यावर त्या म्हणाल्या, 'भाजप आम्हाला संसदीय शिष्टाचार शिकवत आहे, याचं मला आश्चर्य वाटतं. एका खासदारानं माझ्याशी गैरवर्तन केलं. त्यामुळं मी सफरचंदला सफरचंदच म्हणेन, संत्री नाही. त्यांनी मला विशेषाधिकार समितीकडं नेलं तर मी माझी मी भूमिका स्पष्ट करेन.'

टीएमसी खासदार पुढं म्हणाल्या, भाजप म्हणत आहे की मी एक महिला असून असा शब्द कसा वापरू शकते. हे सांगण्यासाठी मला पुरुष असण्याची गरज आहे का? अदानीगेट म्हणजे काय हे आम्ही पहिल्यांदाच देशातील जनतेला दाखवून दिलं. भाजप गेल्या तीन वर्षांपासून ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचा मला आनंद आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजप खासदार हेमा मालिनी यांनीही महुआ मोईत्रा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं निशाणा साधलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT