tmc mp santanu sen on mithun chakraborty remarks over 38 leaders in touch with bjp  
देश

मिथुन चक्रवर्तीच्या वक्तव्यावर TMC चे प्रत्युत्तर; म्हणे, बहुतेक मानसिक...

सकाळ डिजिटल टीम

कोलकता : मिथुन चक्रवर्ती यांच्या म्हणण्यावर पश्चिम बंगालमध्ये कोणीही विश्वास ठेवणार नाही, असा दावा तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार शंतनू सेन यांनी केला. तृणमूल काँग्रेसचे तीन डझनहून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा दावा करून खळबळ उडवून दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजप आणि मिथुन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (tmc mp santanu sen on mithun chakraborty remarks)

टीएमसी खासदार शंतनू सेन मिथुन चक्रवर्ती यांच्यावर निशाणा साधला आहे, ते म्हणाले की, मी ऐकले आहे की मिथुन चक्रवर्ती यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मला वाटते की ते शारीरिक नव्हे तर बहुतेक मानसिकदृष्ट्या आजारी होते. अडचण अशी आहे की त्यांना राजकारण कळत नाही, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.

तत्पूर्वी, मिथुन चक्रवर्ती यांनी आजच्या काळात तृणमूल काँग्रेसच्या सुमारे ३८ आमदारांचे आमच्याशी चांगले संबंध आहेत. त्यापैकी सुमारे २१ जण आमच्या थेट संपर्कात असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी हे फक्त एक म्युझिक लॉन्च असून चित्रपट अजून धमाकेदारपणे रिलीज व्हायचा आहे असे म्हटले होते. तसेच आता ट्रेलरची वाट पहा. भाजपला मुस्लीमविरोधी म्हणणे हे केवळ एक षडयंत्र आहे, प्रत्यक्षात तसे काहीही नसल्याचे देखील ते म्हणाले होते.

तसेच सध्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना नुकत्याच झालेल्या अटकेबद्दल विचारले असता, मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “जर पुरावे नसतील तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. पण जर त्याने काही चूक केली असेल तर जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकत नाही,” गेल्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT