Tomato Price Hike 
देश

Tomato Price : टोमॅटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाणार; व्यापाऱ्यांनी व्यक्त केली शक्यता

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. त्यातच टोमॅटोचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार आगामी काळात टोमॅटोचे दर ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

व्यापाऱ्यांनी म्हटलं की, आवक घटल्याने टोमॅटोचे किरकोळ बाजारात दर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे.

दिल्लीतील आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अशोक कौशिक म्हणाले, "अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो १६० रुपयांवरून २२० रुपयांपर्यंत वाढले असून, त्यामुळे किरकोळ दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटो, शिमला मिरची व इतर हंगामी भाज्यांची विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाला घाऊक व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान प्रमुख उत्पादक राज्यांणध्ये मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने महिनाभरापासून टोमॅटोचे दर वाढत आहेत.आझादपूर भाजी मार्केटचे घाऊक व्यापारी संजय भगत यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे भाजीपाला वाहतूक करण्यात खूप अडचणी येत आहेत. उत्पादकांकडून भाजीपाला आणण्यासाठी नेहमीपेक्षा सहा ते आठ तास जास्त लागत आहेत. अशा परिस्थितीत टोमॅटोचे दर ३०० रुपये किलोच्या आसपास पोहोचू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT