Top 10 News Esakal
देश

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Sakal Bulletin News: वाचा सकाळी 9 पर्यंत राजकारण मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा...

आशुतोष मसगौंडे

Maharashtra Politics Sports Entertainment Marathi News Update: आज सकाळी 9 वाजेपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील आगीच्या दोन घटना ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा तिकिट वाटपाचा निकश यांचा समावेश आहे. आज राजकारणाशिवाय मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आम्ही सुरू केले आहे, सकाळ बुलेटीन... वाचा सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी...

मुंबई हादरली! झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, भीषण आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, लहान मुलांचाही समावेश

मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलोनीत बुधवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. सकाळी अंदाजे 4:30 ते 5:00 च्या सुमारास भीषण आगीने एका कुटुंबातील 7 जणांचा जीव घेतला. या दुर्घटनेत दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा.

तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशानंतर अनेकांनी तुतारीची उमेदवारी मिळवी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. अशात शरद पवार यांच्या जवळचे असलेले माजी मंत्री राजेश टोपे यांनी पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबाबतचे गणित मांडत माहिती दिली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा.

मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील शिवडी परिसरात असलेल्या भारत इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मध्यरात्री आगीची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा

महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या बहुतांश भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास शनिवारी (ता. ५) सुरुवात झाली.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा

गंभीर इशारा! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

सूर्यावरून उत्सर्जित झालेल्या शक्तिशाली सौर ज्वालामुळे एक गंभीर भूचुंबकीय वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ X7.1 श्रेणीतील असून, 1 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्यावरून फूटले आहे. यामुळे ‘कोरोनल मास इजेक्शन’ (CME) नावाची शक्ती पृथ्वीच्या दिशेने साधारण 500 किमी/सेकंद वेगाने येत आहे आणि हे वादळ पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा

नवरात्रीत उपवासाला बनवा स्वादिष्ट अन् कुरकुरीत 'Banana Kofta' नोट करा रेसिपी

शारदीय नवरात्री सुरू होऊन 4 दिवस पुर्ण झाले आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी केळीपासून कोफ्ते बनवू शकता.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा

नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

 नवरात्रीच्या प्रत्येकदिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. तुम्हाला आज क्लासी आणि हटके दिसायाचे असेल तर बॉलिवूड अभिनेत्रींकडून ड्रेसची कल्पना घेऊ शकता.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा

जर पाठदुखीमुळे चालणे कठीण झाले असेल तर या टिप्सची घ्या मदत

अनेक लोकांना एकसारखे ऑफिसमध्ये बसून काम केल्याने पाठदुखी आणि मणक्याच्या खालच्या भागात वेदना होतात. यात सौम्य वेदना, तीव्र वेदना जाणवते. पॅथॉलॉजीशी संबंधित कारणांव्यतिरिक्त, संधिवात, स्नायूंचा ताण आणि डिस्कचे नुकसान यामुळे देखील पाठदुखी जाणवते

संपूर्ण बातमीसाठी इथं क्लिक करा

पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

धायरी येथील डीएसके पायथा चव्हाण बाग येथे पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस थेट पत्र्याचे कंपाउंड मध्ये घुसली आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.

बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझी अटक बेकायदेशीर'' वाल्मिक कराडचं नेमकं म्हणणं काय? उज्ज्वल निकमांनी गैरसमज दूर केला

Latest Marathi News Live Updates : उपनगरात पावसाने घेतली उसंत, मुंबईकरांना काहीसा दिलासा

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवसह ८ खेळाडू ठरले, ७ खेळाडूंवरून घोडे अडले! गौतम गंभीर, अजित आगरकरच्या घोषणेकडे लक्ष

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

SCROLL FOR NEXT