मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्याकडून पाहणी sakal
देश

चेन्नईला मुसळधार पाऊस ; पुराचा इशारा

मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्याकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : चेन्नईसह उपनगराला शनिवारी रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे, सखल भाग जलमय झाले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन जलाशयांतून विसर्ग सुरू झाल्याने पुराचा इशाराही देण्यात आला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जलमय भागाची पाहणी केली.

तात्पुरत्या छावणीत हलविलेल्या रहिवाशांना स्टॅलिन व अन्य मंत्र्यांनी दूध,धान्य व ब्लॅंकेटचे वाटप केले. शनिवारी रात्रीच्या १२ तासांत २० सेंमी पाऊस झाल्याची माहिती तमिळनाडूचे आरोग्यमंत्री मा सुब्रमण्यम यांनी दिली. हवामान खात्याने चेन्नईसह उपनगरात १० ते २३ सेंमी पावसाची नोंद झाल्याचे सांगितले. सचिवालयाजवळील द कामराझर सलाई पॉईंटला सर्वाधिक २३ सेंमी पावसाची नोंद झाली.

‘एनडीआरएफ’च्या तुकड्या तैनात

चेन्नइसह कांचीपूरम व तिरुवल्लूर जिल्ह्यांत शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने रात्री चांगलाच जोर धरला. या पावसामुळे चेन्नईतील अनेक भाग जलमय झाले. अनेक जणांच्या घरात पाणीही शिरले. त्याचप्रमाणे, पुंडी, चेंबरमबक्कम आणि पुझाल या चेन्नईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे, चेन्नईसह तिरुवल्लूर आणि मदुराईत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) चार तुकड्या तैनात करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDI Insurance: भारत विमा क्षेत्रात मोठी क्रांती करणार! १००% FDI ला मंत्रिमंडळाची मंजुरी, पॉलिसीधारकांवर काय परिणाम होणार?

Yashasvi Jaiswal संघात असूनही मुंबईने धापा टाकल्या; मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर सारेच हतबल, हैदराबादचा विजय जवळपास पक्काच

Maharashtra News : लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवे कायदे तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सभागृहात मागणी!

Solapur News : लोकनेते गणपतराव देशमुखांचे स्मारक सांगोल्यात मध्यवर्ती ठिकाणी उभारावे; आ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत भूमिका!

Year End : फोटोग्राफीसाठी कोणता फोन खरेदी करावा? 2025 वर्षातले टॉप 5 स्मार्टफोन, बेस्ट कॅमेरा अन् परवडणारी किंमत

SCROLL FOR NEXT