Tradition  esakal
देश

Tradition : भावाभावामध्ये पत्नीची वाटणी? देशातल्या या कोपऱ्यात घर जमीनीसाठी होतेय महाभारत

'मोठ्या भावासोबतच्या लग्नानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या भावांसोबतही माझं लग्न झालं'

सकाळ डिजिटल टीम

Tradition :

आजकाल घराघरात भावांची भांडणं होत आहे. घर, प्रॉपर्टी, जमिन यांच्या वाटण्या होत आहेत. न्यायालयातही भावंडांच्या प्रॉपर्टीसाठी अनेक केस पडून आहेत. तर, काही केसेसमध्ये प्रॉपर्टीसाठी भावाचा जीव घ्यायलाही कमी केले जात नाही. अशा या परिस्थितीत हिमाचल प्रदेशातल्या गावात एक वेगळी प्रथा पाळली जात आहे.

घर,जमिनीचे हिस्से होऊ नयेत, घरात वाद होऊ नयेत यासाठी तोडगा म्हणून घरच्या सुनेच्याच वाटण्या केल्या जात आहेत. होय हे खरं आहे, घरात एक सून आली असेल तर दुसऱ्यानेही तिच्याचसोबत संसार करावा ज्यामुळे घरात वाद होणार नाहीत, असा या प्रथेमागील उद्देश आहे.

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्याला गिरी नदी दोन भागात विभागते. त्यातील एक गिरी आर आणि दुसरा गिरी पार होय. यातील गिरी पार भागात हाटी समुदायाचे लोक अधिक प्रमाणात राहतात.  या समुदायात ‘जोडीदार’ ही प्रथा आहे.

या प्रथेला बळी पडलेल्या ४५ वर्षीय सुनिला सांगतात की, मी लग्न करून या गावात आले तेव्हा आमचं घर छोटं होतं. एकच खोली होती. माझे सासू सासरे आणि आम्ही दोघं त्या खोलीत रहायचो. आम्ही त्या खोलीत वेगळा आडोसा करून झोपायचो. त्यावेळी माझा दिर लहान होता. तो शाळेला जायचा.

जेव्हा तो लग्नायोग्य झाला तेव्हा घरच्या गरीबीमुळे त्याच्या लग्नाबाबतीत जोडीदार प्रथेचा विचार करण्यात आला. मला फक्त सांगण्यात आलं की, आजपासून तुझ्या दिरालाही नवराच समज. सासू सासरे आणि पतीनेही आहे हे तुझंच राहील, यात वाटण्या पडणार नाहीत, असे सांगितले. मी ते मान्य केलं. कारण, आमच्यात ही प्रथा पुर्वापार चालत आली आहे. त्यामुळे मी विरोध केला नाही.

ज्या दिराला खेळताना पाहिलं ज्याला जेवण भरवलं त्याला आता मी माझा पती मानलं होतं. एकत्र कुटुंब पद्धती असल्याने आम्ही तिथेच त्या घरात रहायचो. या दोन भावंडांनी माझ्यासोबत झोपण्यासाठी दिवस वाटून घेतले होते. ते ही आनंदाने.

सुरूवातीला मला गावात फिरताना लाज वाटायची. लोक काय म्हणत असतील. माझ्याबद्दल काय विचार करत असतील याचा मी विचार करत बसायचे. पण, आता मी सगळा विचार सोडून दिला आहे. मला आता त्या माझ्यावर रोखणाऱ्या नजरांची सवय झाली आहे. होतेच आपल्याला सवय, असेही सुनिला म्हणाल्या.

हाटी सामुदायात दोन भावंडांसोबत एक पत्नी विभागली जाते. तशी, त्यांची मुलेही विभागली जातात. या समाजात मुलाचे स्वागत जल्लोषात केले जाते. गावजेवण घातलं जातं. पण, मुलीच्या जन्मावर दु:ख व्यक्त केलं जातं.

देवाच्या पूजेवेळी आपल्याकडे पतीसोबत पत्नीला मान असतो. तर, या समाजात जोडीदार प्रथेत एक पत्नी आणि तिचे दोन्ही पती असे मिळून पूजा करतात.

जास्त काळजी आणि प्रेम कोण करतं असा प्रश्न जेव्हा त्यांना केला गेला तेव्हा त्या म्हणाल्या की, प्रेम तर असच आहे, ते घेऊन काय करायचं? मी या दोघांसोबत आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि लहान भाऊ काळजी घेतो कारण मोठा शहरात राहतो त्याला माझ्यासाठी वेळ नाही. तो कधीतरी गावात येतो.

मी ही त्या दोघांमध्ये भेदभाव करत नाही. एकाला जास्त दुसऱ्याला कमी असं नाही करत. उलट मी देवाकडे प्रार्थना करते की माझ्या नितळ मनाने मी त्यांची सेवा करू शकेन असा आशिर्वाद दे. मी त्या दोघांचीही सारखीच काळजी घेते. पाणी,जेवण, त्यांचे कपडे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सारख्याच आहेत.

इतकंच नाहीतर मी या दोघांच्याही शारीरिक सुखाच्या इच्छाही पूर्ण करते. सुरूवातीला मला या गोष्टीचा त्रास व्हायचा, मला रोज त्यांना खूश करावं लागायचं कारण मी जर त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकले नाही. तर ते बाहेर अनैतिक संबंध प्रस्थापित करतील. किंवा मला सवत घेऊन येतील ही भिती होती. त्यामुळे त्यांना हवं तसं मी वागले. पण, आता वयाच्या उतारत्या वयात ते मला समजून घेतात. जबरदस्ती करत नाहीत,असेही सुनिला म्हणाली.

याच गावात तीन पतींसोबत राहणारी मिना म्हणते की, मी देवाकडे प्रार्थना करत असते की मला या तिघांसोबत एकसारखीच वागणूक करण्याची बुद्धी दे. घरची परिस्थिती हालाखीची होती त्यामुळेच मलाही तिन पतींसोबत रहावे लागले आहे.

मोठ्या भावाचे लग्नानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या भावंडांसोबतही माझं लग्न झालं. या तिघांनीही मला वाटून घेतलं आहे. पहिल्या दिवशी मोठा, मधला आणि सर्वात शेवटी छोटा असे तिघे माझ्यासोबत रात्री वेळ घालवतात, असे मिना यांनी सांगितले.

आम्ही गरीबीमुळे जे भोगलं ते आमच्या मुलांना भोगू दिले नाही. जूनी प्रथा आहे आम्ही चालवली. मात्र, पुढच्या पिढीत आम्ही भावंड आणि मुलींची लग्न वेग-वेगळ्या व्यक्तीसोबत केली आहेत,असेही त्या म्हणाल्या.

या संपूर्ण प्रथेवर हाटी समाजातील प्रमूख कुंदन सिंह शास्त्री म्हणतात की, हिमाचल भागात अनेक वर्ष पांडवांचा वास होता. त्यांच्यामुळेच आमच्या समाजातही ही प्रथा पडली. या गावात प्रत्येक घरात एखाद्या पिढीत ‘जोडीदार’ प्रथा पार केली गेली आहे.

या समाजाचे वैशिष्ट्य असे आहे की, महिलांची वाटणी केली तरी घरातील प्रत्येक निर्णयात त्यांचे मत महत्त्वाचे मानले जाते, असेही कुंदन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT