trai directs telecom companies to have at least 1 plan allowing 30 days recharge validity  
देश

30 दिवस वैधता असलेला एकतरी रिचार्ज प्लॅन हवा; TRAI चे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) दूरसंचार कंपन्यांबाबत कठोर होत सर्व दूरसंचार कंपन्यांना 30 दिवस म्हणजे संपूर्ण महिन्यासाठी वैधता असणारा कमीत कमी एक टॅरिफ प्लॅन (Tariff Plan) असणे बंधनकारक केले आहे. TRAI कडून रिचार्ज प्लॅनच्या वैधतेबाबत (Recharge Plan Validity) टेलिकॉम कंपन्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.

रिचार्जबाबत सूचना

ट्रायने म्हटले आहे की, किमान एक प्लॅन संपूर्ण महिन्यासाठी वैध असावा. तसेच प्रत्येक कंपनीच्या प्लॅनमध्ये एक विशेष व्हाउचर, कॉम्बो व्हाउचर संपूर्ण महिन्यासाठी व्हॅलिडिटी असलेले ठेवावे लागेल. ज्यामध्ये 30 दिवसांची रिचार्ज व्हॅलिडिटी मिळते. ट्रायने 1999 च्या दूरसंचार आदेशात बदल करत, गुरुवारी सांगितले की, प्रत्येक दूरसंचार सेवा प्रदात्याने किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि तीस दिवसांची वैधता असलेले एक कॉम्बो व्हाउचर ऑफर केला पाहिजे. तसेच पुढे, प्रत्येक सेवा प्रदात्याने किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर देखील ऑफर केले पाहिजे जे प्रत्येक महिन्याच्या त्याच तारखेला रिन्यू करता येईल.

28 दिवसांच्या व्हॅलिडिटी बाबात तक्रार

TRAI ने सांगितले की, त्यांना 28 दिवसांच्या वैधतेसह (किंवा त्यापेक्षा जास्त) दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या टॅरिफ प्लॅनबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या तक्रारी ग्राहकांकडून मिळाल्या आहेत. 30 दिवस किंवा एक महिन्यासाठी वैधता असलेल्या टॅरिफ ऑफरबद्दल ट्रायने सांगितले की, नव्या दुरुस्ती लागू झाल्यानंतर, दूरसंचार ग्राहकांना चांगली वैधता आणि कालावधीची सर्व्हिस ऑफर निवडण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT