Railway Sakal
देश

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! कन्फर्म तिकीटावर दुसरा व्यक्ती करु शकेल प्रवास

विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही तुमचं कन्फर्म असलेलं तिकीट दुसऱ्या एखाद्या प्रवाशाला ट्रान्सफर करु शकता. यासाठी रेल्वेने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. नियमांमध्ये हे बदल होण्यापूर्वी जर आपल्या कन्फर्म तिकीटावर कुणी दुसरा व्यक्ती प्रवास करताना आढळून आल्यास, त्याला दंड सोसावा लागायचा. सोप्या शब्दात, तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही काही कारणास्तव जर प्रवास करु शकत नसाल तर तुमचं कन्फर्म झालेलं तिकीट कॅन्सल करावं लागायचं.

स्टेशन मास्टरला द्यावा लागेल अर्ज

रेल्वे प्रवाशांना याप्रकारे तिकीट कॅन्सल करावं लागल्यामुळे अनेकदा मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावं लागायचं. रेल्वेने आता याच नियमांमध्ये बदल केला आहे. इंडियन रेल्वेने आरक्षित तिकीटांसाठी प्रवाशांना एक खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या अंतर्गत जे लोक कन्फर्म तिकीटावर प्रवास करु शकत नाहीत, असे लोक आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर हे तिकीट ट्रान्सफर करु शकतात. याप्रकारे तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज स्टेशन मास्टरला द्यावं लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुम्हाला तुमचं तिकीट दुसऱ्या व्यक्तीला देता येऊ शकतं.

कुणाला करता येईल तिकीट ट्रान्सफर?

रेल्वे प्रवाशी असे कन्फर्म तिकीट फक्त आपले आई-वडिल, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी, पती आणि पत्नीच्या नावावरच ट्रान्सफर करु शकतात. बदललेल्या या नियमांनुसार, रेल्वे प्रवाशी आपल्या मित्राच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करु शकत नाहीत. लग्न किंवा पार्टीला जाणाऱ्या लोकांसमोर जेव्हा अशी परिस्थिती येते, तेव्हा आयोजकांना आवश्यक कागदपत्रे 48 तास अगोदर सादर करावी लागतात. रेल्वे स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन तिकीट हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याव्यतिरिक्त, आपण ही प्रक्रिया ऑनलाइन देखील पूर्ण करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT