trainer aircraft crashes in azamgarh one dead and another injured 
देश

हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकाचा जागीच मृत्यू

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): आझमगडमधील सरायमीर भागात असलेल्या कुसहां गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात वैमानिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली. अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी विमानतळाहून टू-सीटर चार्टर्ड एयरक्राफ्ट टीबी20 या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. आझमगडमध्ये खराब हवामानामुळे सकाळी 11 च्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात झाला. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दुर्घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात वैमानिकाचा मृतदेह सापडला. दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर शेतात कोसळत असताना अनेक शेतकऱयांनी पाहिले. यावेळी दोघेजण पॅराशूटच्या सहाय्याने खाली येत असल्याचे पाहिले. हेलिकॉप्टर कोसळल्याचे समजल्यानंतर अनेकांनी शेताकडे धाव घेतली. हेलिकॉप्टरचे तुकडे झाले होते. आझमगडचे जिल्हाधिकारी अरूण कुमार यांनी सांगितले की, 'दुर्घटनाग्रस्त विमान हे अमेठीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकेडमीचे (IGRUA) आहे. शेतातील चिखलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याने पोलिसांना काही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT