vaccin 
देश

न्यूयॉर्कला जा आणि लस मिळवा मोफत; ऑफरमुळे ट्रॅव्हल कंपनी वादात

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - जगभरत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून एक वर्ष झालं तरी यावर अद्याप औषध आलेलं नाही. दरम्यान, काही देशांमध्ये व्हॅक्सिनचा शोध सुरू असून लवकरच ते उपलब्ध होईल अशी माहिती कंपन्यांनी दिली आहे. यातच आता एका टुरिझम कंपनीने लोकांना व्हॅक्सिन टुरिझमची ऑफर दिल्यानं वाद निर्माण झाला आहे. यावर कंपनीला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. 

राधिका गुप्ता यांना शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये एका टुरिझम कंपनीचा मेसेज दिसत आहे. त्यानुसार कंपनी डिसेंबर महिन्यात अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक अशा पॅकेजची ऑफर देत आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये मुंबई ते न्यूयॉर्क आणि पुन्हा मुंबईला असं तीन दिवस आणि चार रात्रीचं पॅकेज आहे. यासाठी 1 लाख 74 हजार 999 रुपये मोजावे लागतील. यात एअरफेअर आणि हॉटेलमध्ये राहणं याचा समावेश आहे.

जाहिरातीमध्ये ब्रेकफास्ट आणि व्हॅक्सिनच्या डोसचा उल्लेख आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या आधारवर बूकिंग होईल. मात्र या जाहिरातीनंतर वाद झाल्याने कंपनीला स्पष्टीकरण द्यावं लागले. 

मेसेजमध्ये म्हटलं आहे की, आम्ही व्हॅक्सिन टुरिझम विकसित करत आहे. कशा प्रकारे अमेरिका व्हॅक्सिन उपलब्ध करून देते याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला हेल्थकेअर वर्कर्सना आणि त्यानंतर आजारी असलेल्या आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना व्हॅक्सिन दिल्यानंतर व्हॅक्सिन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कंपनीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, आम्ही व्हॅक्सिन ठेवत नाही आणि खरेदीसुद्धा करत नाही. सर्वकाही अमेरिकेच्या कायद्यानुसार होईल.

कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे अॅडव्हान्स किंवा डिपॉझिट करण्यात आलेलं नाही. रजिस्ट्रेशनसाठी नाव, ईमेल, मोबाइल नंबर, वय, आजाराची माहिती आणि पासपोर्टची कॉपी घेतली जात आहे. कंपनीच्या माहितीनुसार, पुढची प्रक्रिया अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या परवानगीनुसार पूर्ण कऱण्यात येईल. कंपनीने सावध करताना असंही म्हटलं आहे की, जोपर्यंत ते अधिकृतपणे अमेरिकेच्या लोकांव्यतिरिक्त इतरांना व्हॅक्सिन देण्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत आम्ही व्हॅक्सिन देऊ शकत नाही असंही स्पष्ट केलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT