corona. 
देश

मोठी बातमी! महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'कोरोना' नियम

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली अलर्ट झाली आहे. देशातील पाच राज्यातील नागरिकांना दिल्लीत यायचं असल्यास त्यांना कोरोनाची चाचणी करुन घेणं आणि रिपोर्ट निगेटिव्ह येणं अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यातून दिल्ली येणाऱ्या नागरिकांनी निगेटिव्ह RT-PCR दाखवल्यावर दिल्लीमध्ये एंट्री मिळणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्ण या पाच राज्यातून आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यातून दिल्ली जाणाऱ्या लोकांना अगोदर कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. या राज्यातून आलेल्या लोकांची 72 तासांच्या आत केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाहूनच त्यांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार आहे. 

दिल्ली सरकारने जारी केलेला हा आदेश 26 फेब्रुवारीच्या रात्रीपासून 15 मार्चच्या दुपारी 12 पर्यंत लागू असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विमान, ट्रेन आणि बसने दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम असणार आहे. दिल्लीत कारने येणाऱ्या प्रवाशांना यातून सूट असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष करुन महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT