शंतनू ठाकूर-नरेंद्र मोदी.
शंतनू ठाकूर-नरेंद्र मोदी. 
देश

बांगलादेश दौऱ्याने आचारसंहितेचा भंग; तृणमूलची मोदींवर कारवाईची मागणी

पीटीआय

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचा भंग झाला अशी तक्रार तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तृणमूलचे प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांनी २८ तारखेला लिहिलेले पत्र मंगळवारी प्रसिद्धीस देण्यात आले. बांगलादेशातील मोदी यांच्या काही कार्यक्रमांमागे राज्यातील काही विशिष्ट मतरारसंघांमधील मतदानाच्या पद्धतीवर प्रभाव टाकण्याचा उद्देश होता. त्यामुळे मोदी यांना ताकीद तर देण्यातच यावी, पण भविष्यात ते अशा गैरवर्तनाच्या पुनरावृत्तीचे धाडस करू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी यांनी २६-२७ मार्च रोजी बांगलादेश दौरा केला. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोदी यांना आमंत्रित केले होते. या पार्श्वभूमीवर ओब्रायन यांनी पत्र लिहिले आहे. मोदी यांच्याकडून बांगलादेश दौऱ्यात लोकशाही तत्त्व आणि निवडणूक आचारसंहितेचे ढळढळीत उल्लंघन असा पत्राचा विषय आहे.

त्यांनी म्हटले आहे की, अधिकृत उद्देशांसाठी मोदी यांनी दौरा करण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. शेवटी बांगलादेश स्वतंत्र करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. खास करून पश्चिम बंगालने यात विलक्षण योगदान दिले. तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील बंगाली बांधवांनी पश्चिम पाकिस्तानच्या जुलमी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुकारलेल्या धाडसी लढ्यात त्यांना बहुमोल साथ दिली. मोदी यांनी २७ मार्च रोजी केलेल्या दौऱ्यास मात्र आमचा तीव्र आक्षेप आहे. बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव किंवा वंगबंधू यांची जन्मशताब्दी यापैकी कशाचाही याच्याशी संबंध नाही. सध्या सुरु असलेल्या बंगालमधील निवडणुकीच्या मतदानावर प्रभाव टाकण्याचाच एकमेव आणि निर्विवाद उद्देश यामागे आहे.

शंतनू ठाकूर यांचा उल्लेख
मोदी यांनी बंगालमधील भाजप खासदार शंतनू ठाकूर यांनाही दौऱ्यावर नेले होते. यास आक्षेप घेऊन ओब्रायन यांनी म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही खासदार किंवा प्रतिनिधीला आमंत्रित करण्यात आले नाही. ठाकूर यांना केंद्र सरकारमध्ये कोणतेही अधिकृत पद नाही. यानंतरही आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मोदी यांनी परदेशातून निवडणूक प्रक्रियेत ढवळाढवळ केली.

कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने इतक्या बिनदिक्कतपणे असे अनैतिक आणि लोकशाहीविरोधी वर्तन करून परदेशात आपल्या पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार करून निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसविलेली नाही.
- डेरेक ओब्रायन, तृणमूल प्रवक्ते

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT