Tripura Assembly Elections Thinking of buying BJP MLAs says Tipra Motha chief Pradyot Manikya Debbarma  
देश

Tripura Election : महल विकून भाजपचे आमदार विकत घेणार; राजघराण्यातील व्यक्तीचा खळबळजनक दावा

सकाळ डिजिटल टीम

त्रिपुरा विधानसभा निवडणूक २०२३ (Tripura Assembly Elections) पाहता राज्यात गुरुवारी (१६ फेब्रुवारी) मतदान होत आहे. यावेळी त्रिपुरामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांकडून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत.

राज्यात सुरू असलेल्या मतदानादरम्यान टिपरा मोथा प्रमुख प्रद्योत माणिक्य देबबर्मा यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे २५ ते ३० आमदार विकत घेण्याचा विचार करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रद्योत देबबर्मा म्हणाले की, केवळ त्यांचा पक्ष (टिपरा मोथा) सत्ताधारी भाजपविरुद्ध लढा देत आहे. त्रिपुरा निवडणुकीत त्यांचा पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकला नाही तर भाजप आमदारांना विकत घेण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवडणुकीनंतरच्या युती तसेच घोडे-बाजाराबद्दल विचारले असता, देबबर्मा म्हणाले की आम्हाला म्हणजे टिपरा मोथाला ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर ते त्यांच्या महलाचे काही भाग विकतील आणि भाजपचे २५-३० आमदार विकत घेतील.

पुढे बोलताना ते म्हणाले की पैसा हा पैसा असतो. फक्त आम्हीच विक्रीसाठी आहोत असे का गृहीत धरले जाते? फक्त आपल्याबद्दलच प्रश्न का उपस्थित केले जातात? भाजपचेही विकत घेतले जाऊ शकतात.

यापूर्वी टिपरा मोथाचे अध्यक्ष प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा (Pradyot Kishore Manikya Debbarma) यांनी १६ फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण सोडणार असेही जाहीर केले आहे. त्यांनी आपण राजाप्रमाणे कधीही मत मागणार नसल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, २ मार्चनंतर आपण राजकारणात नसेल पण सदैव आपल्या जनतेच्या पाठीशी राहणार हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT