Tripura Chief Minister Biplab Deb resigns Tripura Chief Minister Biplab Deb resigns
देश

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचा राजीनामा; राज्यपालांना राजीनामा सुपूर्द

सकाळ डिजिटल टीम

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी शनिवारी (ता. १४) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिप्लब कुमार देव (Biplab Deb) यांच्या अचानक राजीनाम्याच्या वृत्ताने राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्रिपुरामध्ये बिप्लब कुमार देव यांची प्रतिमा भाजपचे मोठे नेते अशी आहे. सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या राजीनाम्याचे (resigns) कारण स्पष्ट झालेले नाही. (Tripura Chief Minister Biplab Deb resigns)

२०१८ मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत बिप्लब देब हे राज्यातील भाजपचा सर्वांत मोठा चेहरा होते. त्यांनी राज्यातील २५ वर्ष जुन्या डाव्या सरकारचा पराभव करून भाजपला राज्यात सत्तेवर आणले होते. बिप्लब कुमार देव (Biplab Deb) यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द केला आहे.

अलीकडेच बिप्लब कुमार देव यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून बिप्लब कुमार देव यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. आज सायंकाळी त्रिपुरामध्ये भाजप (BJP) आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीला भाजप नेतृत्वाच्या वतीने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पक्ष प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षासाठी काम केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने मी त्रिपुरातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. राज्यात शांतता, सुरक्षा आणि विकासाची हमी देताना मी कोरोनाच्या काळात राज्याला त्याच्या प्रभावापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला, असे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिप्लब कुमार देव म्हणाले.

सर्वकाही ठरावीक वेळेसाठीच येते

सर्वकाही ठरावीक वेळेसाठीच येते. आम्हीही त्या निर्धारित वेळेत काम करतो. मला मुख्यमंत्री म्हणून किंवा इतर कोणत्याही पदावर कुठेही पाठवले तर मी त्यासाठी तयार आहे, असेही बिप्लब कुमार देव (Biplab Deb) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT