K Chandrasekhar Rao esakal
देश

Telangana : राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री; स्वत: च्या पक्षाचं नाव बदलून दिलं 'हे' नवं नाव

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं आहे.

K Chandrasekhar Rao News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao KCR) यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांच्या पक्षाचं म्हणजेच, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi BRS) केलं आहे.

केसीआर यांच्या या निर्णयामुळं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलंय. केसीआर यांचं हे पाऊल टीआरएसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या आणि भाजपशी प्रभावीपणे सामना करण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचं मानलं जातं आहे. याबाबतचा ठराव पक्षाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी ठरावाचं वाचन करुन घोषणा केली की, पक्षाच्या सर्वसाधारण सभेनं टीआरएसचं नाव बदलून बीआरएस करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाचं नाव बदलल्यानंतर आता राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा देशभर प्रचार केला जाणार आहे. इतकंच नाही तर समर्थकांनी हैदराबादच्या रस्त्यावर 'देश का नेता केसीआर' अशी घोषणा देणारे पोस्टरही लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून केसीआर यांचं राष्ट्रीय नेते म्हणून वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जूनमध्ये झालं नव्या पक्षाच्या नावावर मंथन

या वर्षी जूनमध्ये केसीआर यांनी टीआरएस नेत्यांसोबत राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याच्या कल्पनेवर चर्चा केली होती. मात्र, तेव्हा नवीन पक्षाच्या कल्पनेवर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. त्या वेळी टीआरएसच्या सूत्रांनी असंही सांगितलं की, 'भारत राष्ट्रीय समिती' (BRS), 'उज्ज्वल भारत पार्टी' आणि 'नया भारत पार्टी' यासारख्या काही नावांवर नव्या पक्षासाठी चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धोनीचा 'Beast' मोड, ७५ लाखांची गाडी चालवताना दाखवून दिलं आर्मीप्रेम....तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

SCROLL FOR NEXT