two brothers in the same place in the same manner mystery unraveled from birth patrika
two brothers in the same place in the same manner mystery unraveled from birth patrika 
देश

आता काय राहिलंय..काहीच नाही..अध्याय समाप्त...!

वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश): दोन सख्या भावांनी एकाच ठिकाणी आणि एकसारख्या प्रकारे आत्महत्या कल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या भावाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहीले होती की, 'आता काय राहिलंय..काहीच नाही..अध्याय समाप्त...!' पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोठा भाऊ प्रवीण चौहान याने शिप्रा येथील पुलावरुन नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी (ता. 12) छोटा भाऊ पीयूष चौहान याने त्याच जागेवर जाऊन नदीत उडी मारुन आत्महत्या केली. दोघांनी एकसारख्याच आत्महत्या केल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे. शिवाय, दोघांचाही आत्महत्येचा योग होता, अशी माहिती पत्रिकेतून पुढे आली आहे. प्रवीणने आत्महत्येपूर्वी आपली पत्रिका तयार केली होती. त्यामध्ये त्याने आत्महत्येचा योग असल्याचे लिहीले होते. प्रवीणने लिहिले होते की, 'कितीही प्रयत्न केला तरी ग्रहांच्या दशेनुसार आत्महत्येचा योग निश्चित आहे. आता काय राहिलंय..काहीच नाही..अध्याय समाप्त...!'

प्रवीणने मरण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, 'कर्ज, आजारपणामुळे त्रस्त आहे. शिवाय, कुटुंबाला श्राद्ध न घालण्याची विनंती केली होती.' प्रवीणच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी त्याचा छोटा भाऊ पीयूषनेही शिप्राच्या पुलावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. पीयूष आपल्या भावाच्या फोटोसाठी फुल आणायता जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. दोन्ही भावांनी एकाच ठिकाणी जाऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT