Uttar Pradesh Lakhimpur Kheri esakal
देश

Lakhimpur Kheri : बलात्कारानंतर हत्या? दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवले

"या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे."

सकाळ डिजिटल टीम

"या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे."

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी (Uttar Pradesh Lakhimpur Kheri) येथील निघासन पोलीस स्टेशन (Nighasan Police Station) हद्दीतील लालपूर माजरा तमोली पूर्वा गावात अनुसूचित जातीच्या दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी विरोध केला.

याप्रकरणी सध्या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. अन्य तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी खून, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केलाय. दोन मुली झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर लखीमपूर खेरीचे अतिरिक्त एसपी अरुण कुमार सिंह म्हणाले, "या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे." पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि मुलींच्या कुटुंबीयांनी निषेध मोर्चा काढून रास्ता रोको केला. कुटुंबीयांनी तीन जणांवर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला असून गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या निघासन चौकात आंदोलन केलं.

लखीमपूर खेरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) संजीव सुमन पोलिस दलासह आंदोलनस्थळी पोहोचले आणि त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं की, 'आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.' तर दुसरीकडं लखनौ रेंजचे पोलीस महानिरीक्षक (IG) लक्ष्मी सिंह यांनी सांगितलं की, "लखीमपूर खेरीमधील एका शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. मृतदेहांवर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे." दोन बहिणींचं वय १५ आणि १७ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलींच्या आईनं माध्यमांना सांगितलं की, दोन्ही मुली चारा काढत असताना शेजारच्या गावातील तीन तरुणांनी बाईकवरून दोन मुलींना झोपडीजवळून पळवून नेले, असा आरोप त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT