Two Hizbul terrorists killed in Jammu & Kashmir encounter test positive for COVID-19 
देश

धक्कादायक ! जवानांनी ठार केलेले दहशतवादी निघाले कोरोना पॉजिटिव्ह

वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये लष्कारांनी शनिवारी हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते. या दोन्ही दहशतवाद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही याबाबत माहिती दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कायदेशीर वैद्यकीय तपासणीदरम्यान त्या दहशतवाद्यांचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले होते. रविवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या सीडी रुग्णालयातून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्या दोन्ही दहशतावद्यांच्या मृतदेहांची करोना विषाणूच्या संबंधित नियमांनुसार विल्हेवाट लावण्यात आले आहे.
-------------
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट
-------------
सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !
------------
अली भाई ऊर्फ हैदर असे एका दहशतवाद्याचे नाव असून असून, दुसऱ्याची ओळख पटलेली नव्हती. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवानही जखमी झाला होता. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चकमक झालेल्या ठिकाणहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे. कुलगाममधील अराह भागात शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली होती. हे दोन्ही दहशतवादी हिजबूल या दहशतवादी संघटनेशी निगडीच असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन्ही दहशतवाद्यांपैकी एका परदेशी असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT