Two jawans martyred and Six terrorists killed in two encounters in Jammu and Kashmir Kulgam district  
देश

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक! 6 दहशतवादी ठार तर 2 जवान शहीद

Jammu-Kashmir Encounter : कुलगाम जिल्ह्यातील मोदरगम आणि चिन्नीगम या दोन गावांमध्ये शनिवारी रात्री चकमक सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर, ता. ७ (पीटीआय) : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये जवानांनी सहा दहशतवाद्यांना ठार मारले. यावेळी दोन जवानही हुतात्मा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातील एक जवान अकोला तालुक्यातील आहे.

कुलगाम जिल्ह्यातील मोदरगम आणि चिन्नीगम या दोन गावांमध्ये शनिवारी रात्री चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू असतानाच या चकमकी झाल्या. जवानांनी केलेल्या गोळीबारात मोदरगम येथे दोन तर चिन्नीगम येथे चार दहशतवाद्यांना मारण्यात जवानांना यश आले. या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मात्र या चकमकींमध्ये दहशतवाद्यांशी लढताना दोन जवानांनाही हौतात्म्य आले. दोन्ही गावांमध्ये दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम आज दुपारपर्यंत सुरू होती.

सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे. आज एकाच दिवसांत सहा दहशतवाद्यांना मारल्याने या मोहिमेत मोठे यश मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘सुरक्षा दलांच्या यशामुळे जम्मू-काश्‍मीरमधील वातावरण सुरक्षित होत असून सामान्य जनताही दहशतवादाविरोधात एकजूट होत आहे. यामुळे मोहिमांना वेगही येत आहे,’ असे पोलिस महासंचालिका रश्‍मी स्वेन यांनी सांगितले.

अकोल्यातील जवान हुतात्मा

या चकमकींमध्ये हुतात्मा झालेल्या दोन जवानांमध्ये एक जण महाराष्ट्रातील अकोल्यातील आहे. प्रभाकर जंजाल असे त्यांचे नाव असून चिन्नीगाम येथे दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ८) अकोल्यात अंत्यसंस्कार होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

SCROLL FOR NEXT