Gang Rape Esakal
देश

पॉर्न व्हिडिओ पाहून 2 अल्पवयीन मुलींवर 5 तरुणांचा सामूहिक बलात्कार

सकाळी मुली शेतात भाजीपाला तोडायला गेल्या असताना ही घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

पाटणा: महिलांचा सन्मान व्हावा म्हणून आज जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. मात्र खरचं महिला इतक्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न बिहारच्या (Bihar) घटनेने उपस्थित होत आहे. काल बिहारच्या शेखपुरा (Sheikhpura) जिल्ह्यातील बारबिघा पोलिस स्टेशन परिसरात ५ किशोरवयीन मुलांनी २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. या घटनेने पुन्हा आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत पोलिसात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुली शेतात भाजीपाला तोडायला गेल्या असताना ही घटना घडली. यावेळी किशोरवयीन मुलांनी मुलींचा विनयभंग केला. या मुलांनी मुलींना काही रूपयेही दिले. तसेच याबाबत कोणालाही माहिती न देण्याची धमकी त्यांनी दिली. नातेवाईकांना हे समजताच त्यांनी त्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र यावेळी ३ मुले पळून जाण्यात यशस्वी झाली. या मुली सरकारी शाळेत इयत्ता ६ वी व ७ वीत शिकत आहेत. आरोपींपैकी ३ जण ६ वीच्या वर्गात शिकत आहेत, तर एक आरोपी ७ वीत तर दुसरा ८ वीच्या वर्गात शिकत आहे.

सापडलेली दोन मुले आणि पळून गेलेली मुले ही एकाच गावचे रहिवासी आहेत. यातील एक मुलगा हा मुलींच्या शेजारी राहतो असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी २ आरोपींना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस तपास करत आहेत. या दरम्यान मुलांनी स्मार्ट फोनवर पॉर्न व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने सध्या ते बाल कल्याण संकुल येथे रिमांड होममध्ये आहेत. यांच्यावर कलम १६४ अंतर्गत न्यायदंडाधिकार्‍यांसमोर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांच्यावर ३७६ डी (सामूहिक बलात्कार), ५०६ (२) (गुन्हेगारी धमकावणे), १२० (बी) (गुन्हेगारी कट) आणि ११४ (गुन्हा घडल्यावर उपस्थित राहणे) यासह भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक गुन्ह्या संदर्भात या आरोपींनी जास्तीत जास्त शिक्षा होईल असे शेखपुराचे पोलिस अधीक्षक कार्तिकेय के शर्मा (Kartikeya K Sharma) यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT