देश

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला; दोन कर्मचारी शहीद

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील बंदीपोरा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (terrorists attack) दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत. सध्या सुरक्षा रक्षकांनी या भागाला संपूर्ण बाजूने घेरलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. बंदीपोरामधील (Bandipora district) गुलशन चौक भागात (Gulshan Chowk area) आज पोलिसांवर दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एसजीसीटी मोहम्मद सुल्तान आणि सीटी फैयाज अहमद अशी या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. इतर कर्मचारी जखमी झाले आहेत. सध्या या भागाला घेरण्यात आलं आहे. (North Kashmir)

2 डिसेंबरलाही झाला होता हल्ला

2 डिसेंबर रोजीही श्रीनगरमधील डाऊन टाऊन भागातील राजौरी कदलमध्ये दहशतवाद्यांनी ट्राफीक पोलिसावर अचानकच हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये ट्राफीक पोलिस शहीद झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. येणाऱ्या-जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर विशेष नाके लावण्यात आले होते. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT