Death 
देश

रशियाच्या दोन महिलांचा गोव्यात मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन रशियन महिलांचा मृत्यू झाला आहे.

पणजी - सिओलिम गावात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन रशियन महिलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये महिला ज्या भाड्याच्या घरांमध्ये राहत होत्या तिथं मृतावस्थेत आढळल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 24 वर्षीय अॅलेक्झांड्रा जावी गुरुवारी त्यांच्या घरी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्या. तर 34 वर्षांच्या एकाटेरिना टिटोवा त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडल्या.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटोवाच्या मृतदेहावर कोणत्याही जखमांचे व्रण नव्हते. दोन्ही प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून याचा अधिक तपास सुरु आहे.

गेल्या दशकभरात गोव्यात रशियन पर्यटकांची संख्या वाढली आहे. सिओलिममधील मोरजिम आणि अरमाबोल ही गावं समुद्र किनाऱ्याजवळ असून रशियन पर्यटकांमध्ये ही लोकप्रिय ठिकाणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT