two sister story will make you cry at gorakhpur 
देश

दोन चिमुकल्यांची बातमी वाचून तुम्ही रडाल...

वृत्तसंस्था

गोरखपूर (हरियाणा): गुलरिहा परिसरामधील सराय गावामध्ये दोन चिमुकल्या राहात असन, त्यांच्या वाटेला आलेले दुखः जाणल्यानंतर अनेकांना रडू कोसळले आहे. पण, या चिमुकलींच्या मदतीला गावासह पोलिस धावून आले असून, त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण उगवला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 12 आणि आठ वर्षाच्या दोन मुलींची ही गोष्ट आहे. सराय गावामध्ये एक कुटुंबिय राहात होते. गावातील एका धनदांडग्याने त्यांची जमीन परस्पर त्याच्या नावावर करून घेतली. आपली जमीन गेल्याच्या धक्क्याने दोन मुलींच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढे आईनेही मुलींची साथ सोडली. आईचे बाहेर प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर प्रियकरासोबत राहू लागली. दोन्ही बहिणी उघड्या पडल्या होत्या. दोघी एकमेकींची काळजी घेत. मिळेल ते खात. पण, त्यांच्या आयुष्यातील दुखः साथ सोडायला तयार नव्हते. आईने मोठ्या मुलीची विक्री केली. पण, ही गोष्ट गाववाल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विरोध केला आणि विकत घेणाऱयाला पळवून लावले. पुढे आईच्या प्रियकराने मुलींना त्रास देणे सुरू केले. त्याने छेडछाड सुरू केली. दोन्ही बहिणी अत्याचाराला सामोरे जावे लागले.

दोन्ही बहिणींबद्दलची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर प्रियकराने व आईने पळ काढला. ग्रामस्थ व पोलिसांनी एकत्र येत दोन्ही चिमुकल्यांचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला. शिवाय, त्यांना मदत करण्याबरोबरच त्यांची जमीन परत मिळवून देण्याचे ठरवले. ग्रामस्थ व पोलिस दोन्ही मुलींची काळजी घेत असन, त्यांच्यासाठी घरामध्ये लागणारे साहित्य भरून दिले आहे. दोघी एकमेकींची काळजी घेत असून, शाळेमध्ये अत्यंत हुशार आहेत. मोठी बहिण आठवी मध्ये तर छोटी बहिण दुसऱीच्या वर्गात शिकत आहे. गुलरिहा येथील पोलिस निरिक्षक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. शिवाय, त्यांना लागणारी मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी आईच्या प्रियकराविरोधात व जमीन हस्तगत करणाऱयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: गुजरात टायटन्सचे सलामीवीर अपयशी, वैभव सूर्यवंशीला लागली लॉटरी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT